माजलगाव (प्रतिनिधी): “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी विखुरलेल्या मराठी माणसाला संघटित करून त्यांना स्वाभिमानाची ताकद दिली. आज राज्यात सत्तेवर असलेले युतीचे सरकार हे बाळासाहेबांच्या विचारांचीच फलश्रुती आहे,” असे प्रतिपादन माजलगावचे आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी केले. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माजलगाव शहरात त्यांचे भव्य स्मारक उभारणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी यावेळी केली.

ज्येष्ठ शिवसैनिक व नगरसेवकांचा गौरव

​शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने माजलगाव येथील चुन्नु मां चौक येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष साहिल भैया चाऊस, भाजप नेते ज्ञानेश्वर मेंडके, नितीन राव नाईकनवरे, डॉ. अशोक तिडके, जयदत्त नरवडे, दीपक मेंडके, अभय होके पाटील, नारायणराव होके, भागवतराव भोसले, पत्रकार कमलेश जाब्रस, परमेश्वर सोळंके, बाळासाहेब आडागळे, बाबुराव तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

​या सोहळ्यात शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा आमदार सोळंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा

​आमदार सोळंके पुढे म्हणाले की, बाळासाहेबांनी सर्वसामान्यांना राजकारणात स्थान मिळवून दिले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून माजलगावात उभारले जाणारे स्मारक हे येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल.

कार्यक्रमाचे नेटके नियोजन:

या भव्य कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम येवले, शहर प्रमुख धनंजय (पापा) सोळंके आणि युवा सेना तालुकाप्रमुख अभिजीत कोंबडे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धोंडीराम जाधव, माऊली कदम, रामभाऊ सावंत, सुरेश नवले, जय सुतार, नारायणराव चांदबोदले, महादेव सुरवसे, रामेश्वर काशीद, संतोष देवकते, सचिन कराळे, सलीम अत्तार, राजेश चव्हाण, राहुल बावणे, किशोर झुंजुर्के, विलास नेमाने, राजेश कोंबडे यांसह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.