More

    ५ वे भीमथडी मराठी साहित्य संमेलन २३ व २४ मे रोजी केडगावमध्ये; साहित्यिकांची मांदियाळी जमणार

    Published on:

    पुणे | प्रतिनिधी

    पाचवे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन शनिवार दि. २३ व रविवार दि. २४ मे २०२६ रोजी केडगाव, चौफुला (ता. दौंड) येथील श्री बोरमलनाथ मंदिर परिसरात रंगणार आहे. दोन दिवसीय चालणाऱ्या या संमेलनात उद्घाटन, पुरस्कार वितरण, ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कथाकथन, नाट्यप्रयोग आणि कविसंमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

    अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी या संमेलनाचा आयोजन केले जाते. संमेलनाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीला भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, सचिव दीपक पवार यांच्यासह कैलास शेलार, राजाभाऊ जगताप, रामचंद्र नातू, डॉ. अशोकराव जाधव, विनायक कांबळे, दत्तात्रय डाडर, रानकवी जगदीप वनशिव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

    या संमेलनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होणाऱ्या साहित्यिकांसाठी मुक्कामी राहण्याची व भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. संमेलनासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यातील कवी, लेखक आणि कलावंतांनी ९८८१०९८४८१, ८८०५५११०६०, ९८५०२०६९७७ किंवा ८८८८४१०३३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here