केज (प्रतिनिधी) : केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘मिराई प्रतिष्ठान’च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व स्कॉलरशिप वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आदर्श शिक्षिका कै. मिरा शिवदास तपसे (शिनगारे) यांच्या स्मरणार्थ राबवण्यात येणाऱ्या या प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रमाचे हे यशस्वी चौथे वर्ष आहे.
१५ ऑगस्टच्या शुभदिनी विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. यात इयत्ता १० वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींना ‘मिराई स्कॉलरशिप २०२६’ अंतर्गत रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
‘मिराई स्कॉलरशिप’च्या मानकरी:
- प्रथम क्रमांक: कु. मयुरी उत्रेश्वर तपसे (९१.८०%) — ₹५,००० स्कॉलरशिप
- द्वितीय क्रमांक: कु. गौरी नागनाथ पंडीत (९०.००%) — ₹४,००० स्कॉलरशिप
- तृतीय क्रमांक: कु. अंजली अंकुश हाके (८६.२०%) आणि कु. किर्ती गणपती देवकर (८६.२०%) — प्रत्येकी ₹३,००० स्कॉलरशिप
विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचाही सन्मान
दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या इतर विद्यार्थ्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये चि. पवन भारत तपसे, चि. शिवम विलास कल्याणकर, कु. सुष्मिता संभाजी गवळी, कु. स्नेहा अशोक लांब, चि. ओम नानासाहेब तपसे, कु. अक्षरा बाळासाहेब दळवी, कु. नंदिनी बाळासाहेब करपे, कु. अमृता ज्ञानेश्वर गोरे, कु. काजल विलास उमक, चि. अमर सोमनाथ कराड, चि. संकेत रामकिसन तपसे, कु. प्रणिता प्रसाद माने, कु. स्नेहल पांडुरंग काळे, कु. सायली संतोष वाघमारे, कु. ईश्वरी सुशील वाघमारे, चि. गंगाधर बिरुदेव माने, कु. ऋतुजा वाल्मिक माने आणि चि. पृथ्वीराज रामभाऊ माने यांचा समावेश होता. सर्वांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
मान्यवरांची उपस्थिती
हा कौतुक सोहळा गावच्या सरपंच उषा जालिंदर दळवी आणि उपसरपंच नीता बाळासाहेब तपसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप देशमुख, परभणी येथील सरस्वती-धन्वंतरी डेंटल कॉलेजच्या डॉ. तेजस्विनी रमेश तपसे, वीरपत्नी अर्चना सतीश तपसे, माजी उपसरपंच मधुमिता लक्ष्मीकांत तपसे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ मार्गदर्शिका रामकवर परमेश्वर तपसे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
हा उपक्रम मिराई प्रतिष्ठान आणि महेश पेट्रोलियमचे प्रमुख महेश शिवदास तपसे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन सुंदर खुळे सर यांनी केले.
याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, युवा मित्र परिवार, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व गावकरी बांधवांचे आणि शिक्षकवृंदाचे मुख्य आयोजक महेश तपसे यांनी आभार मानले.
