More

    बनसारोळाच्या कन्येची मानाची भरारी!

    Published on:

    ऋतुजा नवघण यांची लोहार बहुउद्देशीय संस्थेच्या बीड जिल्हा प्रभारीपदी निवड

    ​केज | प्रतिनिधी : केज तालुक्यातील बनसारोळा येथील कन्या ऋतुजा नवघण यांची लोहार बहुउद्देशीय संस्थेच्या बीड जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे बनसारोळा गावासह संपूर्ण केज तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    ​सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या लोहार बहुउद्देशीय संस्थेने ऋतुजा नवघण यांच्या कार्यक्षमतेची, नेतृत्वगुणांची आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत त्यांच्यावर बीड जिल्हा प्रभारीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.

    ​या पदाच्या माध्यमातून जिल्हाभर संस्थेचे सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची भावना ऋतुजा नवघण यांनी व्यक्त केली आहे.

    ​ऋतुजा नवघण यांच्या या मानाच्या निवडीबद्दल बनसारोळा ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बनसारोळा गावातील कन्येने जिल्हास्तरीय जबाबदारी स्वीकारत गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here