[
बांभोरी-निमखेडी गावाला जोडणाऱ्या पुलासोबत बंधाऱ्याला प्रशासकीय मान्यता मिळाली होती; परंतु तांत्रिक कारण देतपीडब्ल्यूडीने केवळ पुलाचे काम सुरू केले.यामागे वाळूमाफियांचा दबाव होता, अशीचर्चा होती. आता गिरणा नदीवरच बांभोरी पुलाला समांतर नवीन पुलाची निर्मिती‘न्हाई’कडून होणार आहे. त्यासाठी निविदाप्रक्रियाही राबवली जाते आहे. या ठिकाणीदेखील पूल वजा बंधारा बांधणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु आता देखील पुन्हा वाळूमाफियांच्या दबावामुळे‘न्हाई’कडून केवळ पुलाचे डिझाइन तयार केल्याचा संशय व्यक्त होतो आहे. यानिर्णयामुळे केवळ पूल बांधल्यास वाहतूक सुधारेल; पण पाणी व पर्यावरणाचा मूळ प्रश्नकायम राहणार आहे. शिवाय शहरसौंदर्यीकरणाची संधीही हातून जाईल. गिरणा नदीत बांभोरीजवळ सध्याअस्तित्वात असलेल्या पुलावरून 1979 मध्ये वाहतूक सुरू झाली. या पुलाच्या उभारणीला सुमारे 47 वर्षे पूर्ण झाले आहेत. गिरणा नदीपात्रातून गेल्या अनेक वर्षांपासून बेसुमार वाळू उपसा झाल्यामुळे नदीपात्र 15 ते 20 फूटखोल गेले आहे. यामुळे सध्याच्या जुन्या पुलाच्या पायाला मोठा धोका निर्माण झाला आहे. जर नवीन पुलासोबत बंधारा बांधला, तर नदीपात्रात पाण्याची पातळी टिकून राहील आणि वाळू उपशावर नैसर्गिक निर्बंध येतील असामत प्रवाह आहे. निमखेडीजवळ पुलासोबत बंधाऱ्याला मंजुरी मिळाली होती; परंतु राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्याने पाणी आडवा पाणी जिरवा कागदावरच राहिले. पूल कम बंधारा करण्यासाठी जळगावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांनी एकत्रित येत समितीच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. वाहतूक आणि पाणी प्रश्नसुटेल बांभोरीजवळ नवीन पुलाच्या तांत्रिक आराखड्यात बदल करून बंधारा समाविष्ट केला,तर एकाच खर्चात जळगावच्या वाहतूक आणि पाणी अशा दोन्ही समस्या सुटू शकतात. त्यामुळे आता स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. वाढीव निधीसाठी पाठपुरावा न्हाई’ने सध्याच्या 79 कोटींच्या निधीतून नवीन पुलाची उभारणी, जुन्या पुलाची दुरूस्ती, शहरातील महामार्गाचे व्हाईट टॉपींगला मंजुरी दिली आहे. परंतु पुलासोबत बंधारा बांधल्यामुळे शहराला फायदा होणारअसेल तर वाढीव निधीसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींकडे पाठपुरावा करणार. – स्मिता वाघ, खासदार,जळगाव लोकसभा मतदार संघ. डिझाईनचा अभ्यास करणार गिरणा नदीवर बांभोरीजवळ नवीनपुलाचे डिझाईन तयार झाले आहे.त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे;परंतु जळगावच्या विकासात भरपडणार असेल तर डिझाईनचा अभ्यास करून काय बदल करता येईल याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करणार. पुल कम बंधारा उभारण्यास पाठपुरावा करू. -भाऊसाहेब साळुंखे, प्रकल्प संचालक, न्हाई. मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी व पारदर्शकतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. भरती प्रक्रिये दरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संपूर्ण मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली सर्व चाचण्या होत आहे. उंची व छाती मोजण्यासाठी हैदराबाद येथून टाइम कंपनीचे चेस्ट ॲण्डहाईट मशिन आणण्यात आले होते; मात्र प्रत्येक उमेदवारासाठी 4 मिनिटांचा अवधी लागत असल्याने म्यॅनुअली मोजमाप केले. दरम्यान, दलाल “मीतुमची पोलिस भरतीत निवड करून देतो//” असे खोटे सांगून पैशांची मागणीकरण्याची किंवा इतर कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवण्याची शक्यताआहे. उमेदवारांनी अशा कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषाला बळी पडूनये असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे. यासाठी पूल वजा बंधारा गरजेचा? 1. बंधाऱ्यामुळे गिरणेच्या पात्रात पाणीसाठवता येईल. विद्यापीठ, बांभोरी, सावखेडा,आजूबाजूच्या 5 ते 7 गावांना पिण्याच्यापाण्यासाठी फायदा होईल.
2. नदीत पाणी अडवल्यामुळे परिसरातीलविहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीतमोठी वाढ होऊन सिंचनाचा प्रश्न सुटेल. तसेचवाळू उपशावर हा एकमेव तोडगा असेल.
3. पुलाखाली पाणी साठल्यास शहराच्यासौंदर्यात भर पडेल. रिव्हर फ्रंट किंवा पर्यटनकेंद्र विकसित होईल. गिरणा पंपिंगच्या जागेतउद्यानासाठी पाच कोटी रुपये मंजूर आहेत. यामुळे वाळू उपसा रोखता येईल निमखेडी गावाजवळ शासनाने ‘पूल कम बंधारा’ला मंजुरी दिली होती; परंतु त्या ठिकाणी 40 कोटीरुपयांतून केवळ पूल होत आहे. याच परिसरातबलून बंधाऱ्याची चर्चा गेल्या 20 वर्षांपासून सुरूआहे; परंतु त्याचाही निर्णय नाही. आता गिरणानदीवर नवीन पूल उभारला जाणार आहे तर तोकेवळ पूल न राहता बंधाऱ्यासह उभारावा. देशातव राज्यात अनेक ठिकाणी पुलासोबत बंधाराअथवा बॅरेज उभारले आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोगकेल्यास जळगावजवळ अशी व्यवस्था करणेशक्य आहे. यासाठी सध्याच्या निधीत आणखीवाढ केल्यास बंधारा अस्तित्वात येऊ शकतो.अशा प्रकारचे अनेक प्रकल्प राबवले गेले आहेत.त्याचा पुढच्या पिढीला फायदा होईल. शिवायजळगाव शहराच्या सौंदर्यात भर पडेल. तसेचवाळू उपसा देखील सहज रोखता येईल. दरम्यान,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पूल कम बंधारासंदर्भात धोरण आहे. पूल कम बंधाऱ्यामुळे पाणीअडवा पाणी जिरवा अभियानाला बळकटीमिळेल . शिवाय पर्यावरणाचा होणारा ऱ्हासरोखण्यास मदतच होणार आहे. कंपनी म्हणते, बंधारा शक्य बांभोरी येथील गिरणा नदीच्या जुन्या पुलाचीउभारणी करणारे पी. सी. शहा डेव्हलपर्सलिमिटेडचे भावेश शहा यांनी नवीन पुलासोबतबंधारा उभारणे सहज शक्य असल्याचेसांगितले. यासाठी जुन्या पुलाला जोडून नवीनपुलाचे बांधकाम करावे लागेल. नवीन पुलाचीपायाभरणी करताना पाइल फाउंडेशन किंवा वेलफाउंडेशनचा पर्याय आहे. त्यासाठी काँक्रीट बिमतयार करून भिंत उभारून पाणी अडवता येईल.यासाठी थोडा खर्च वाढेल; परंतु त्याचा फायदाअनेक वर्षांपर्यंत होईल. सौंदर्यीकरण, शाश्वतजलस्रोत उपलब्ध होईल असे सांगितले.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/girna-river-bridge-bandhara-nhai-sand-mafia-jalgaon-137185095.html
मुख्यपृष्ठ वर्तमान महाराष्ट्र ताज्या बातम्या दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:गिरणेवर ‘बंधारा-पूल'' शक्य; पण वाळूसाठी विरोध? न्हाईकडून नव्या पुलाच्या कामाची...













