दादाच राहिले नाहीत, कुणाबद्दल जुनं काय काढायचं?:सुप्रिया सुळेंचा भावनिक सूर; एका डोळ्यात आनंद, दुसऱ्यात अश्रू, रोहितच्या 12 तारखेच्या प्रश्नावर स्पष्ट उत्तर

[%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A %E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87 %E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4 %E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2 %E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%82 %E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF %E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95 %E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0
अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबीयांवर भावनिक आघात झाला असताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, शरद पवारांची प्रकृती आता स्थिर आणि चांगली आहे, तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचे त्यांनी आभार मानले. आज एकीकडे आनंद आहे, तर दुसरीकडे प्रचंड दु:ख आहे. दादांचं वय जाण्याचं नव्हतं. ते आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही, असे त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवारांवर आता मोठी जबाबदारी आल्याचेही त्यांनी नमूद केले. रोहित पवार यांनी 12 तारखेला काही खुलासे करणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, सुप्रिया सुळे यांनी अतिशय संयत प्रतिक्रिया दिली. दादाच राहिले नाहीत, कुणाबद्दल जुनं काय काढायचं? असे त्या म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, रोहितची अस्वस्थता स्वाभाविक आहे आणि कुटुंब सध्या कठीण काळातून जात आहे. आम्ही एकमेकांना आधार देत पुढे जात आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणात पारदर्शक चौकशी होईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचेही त्यांनी नमूद केले. सुळे यांनी कुटुंबातील वातावरणाबद्दल बोलताना म्हटले की, एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत. या वाक्यातून घरातील भावनिक स्थिती त्यांनी स्पष्ट केली. अजित पवार यांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव प्रत्येक क्षणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंब एकत्र राहून या प्रसंगाला सामोरे जात असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, रेवतीच्या लग्नाबाबतही सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हे लग्न अजित पवार जिवंत असतानाच त्यांच्या आशीर्वादाने ठरले होते. दादा असते तर या लग्नाची घोषणा त्यांनीच केली असती, असे त्या म्हणाल्या. पुढे काय होईल ते दादांच्या इच्छेनुसार आणि आशीर्वादानेच पाहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दु:ख आणि आनंद अशा मिश्र भावनांमध्ये कुटुंब पुढे जात असल्याचे त्यांच्या शब्दांतून स्पष्ट झाले. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/supriya-sule-emotional-response-ajit-pawar-family-137185571.html