Tehsildar Rakesh Gidde
तहसीलदार राकेश गिड्डे

बीड/केज:

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. लातूर-अंबाजोगाई रोडवरील रेणापूर फाट्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला असून गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला.

​मिळालेल्या माहितीनुसार, राकेश गिड्डे हे आपल्या खासगी वाहनाने प्रवास करत असताना रेणापूर फाट्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासकीय वर्तुळात अत्यंत कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे महसूल विभागात आणि केज तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे.

Accident car