19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत रेखेंकडून दंडक्रम पारायण पूर्ण:कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात होणार विशेष सत्कार

[19 %E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF %E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80 %E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4 %E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8 %E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE %E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3 %E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82 %E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8 %E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4
अहिल्यानगर येथील १९ वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी यजुर्वेदाचे दंडक्रम पारायण यशस्वीरीत्या पूर्ण करून वैदिक परंपरेत एक महत्त्वाचा अध्याय जोडला आहे. त्यांच्या या अद्वितीय साधनेबद्दल आज, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दंडक्रम पारायण हा वैदिक पठणाचा अत्यंत कठीण आणि दुर्मीळ प्रकार मानला जातो. गेल्या सुमारे २०० वर्षांत या पद्धतीने पारायण झाल्याची नोंद आढळत नाही, ज्यामुळे देवव्रत रेखे यांची ही उपलब्धी वैदिक परंपरेतील एक अभूतपूर्व घटना ठरली आहे. हा सत्कार समारंभ आज सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्या तोतडे सभागृहात संपन्न होईल. कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, वेदविद्या संकायाचे अधिष्ठाता प्रो. हरेकृष्ण अगस्ती यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी वेदमूर्ती देवव्रत रेखे स्वतः दंडक्रम पारायणाचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. यामुळे उपस्थितांना या दुर्मीळ वैदिक पठणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाला नागपूरचे प्रख्यात वेदविद्वान् कृष्णशास्त्री आर्वीकर, देवव्रतचे गुरु आणि वडील महेश रेखे, तसेच माहूरगडचे वेदमूर्ती निलेश केदार उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे भूषण ठरलेल्या या युवा वेदमूर्तीच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व वैदिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने प्रो. हरेकृष्ण अगस्ती यांनी केले आहे.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/kavikulguru-kalidas-sanskrit-vidyapeeth-honors-devdutt-rekhde-137104087.html