सिरळी शिवारातून 1 क्विंटल 77 किलो अफूची झाडे जप्त:एक जण ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

[%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80 %E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8 1 %E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B2 77 %E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B %E0%A4%85%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80 %E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87 %E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%8F%E0%A4%95 %E0%A4%9C%E0%A4%A3
वसमत तालुक्यातील सिरळी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका शेतात टाकलेल्या छाप्यात ३.५४ लाख रुपये किंमतीची १ क्विंटल ७७ किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी एका व्यक्ती विरुध्द मंगळवारी ता. १७ पहाटे कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्हयात अवैध व्यवसाय, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या शिवाय शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई केली जात आहेे तर आता अफूची व गांजाची विक्री करणाऱ्यांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. दरम्यान, वसमत तालुक्यातील सिरळी शिवारातील एका शेतात लसणाच्या पिकांमध्ये अफूची झाडे लावण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेेला मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक कारामुंगे, जमादार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, किशोर सावंत, ज्ञानेश्‍वर गोरे, नरेंद्र साळवे, संदीप टाक, साठे यांच्या पथकाने सोमवारी ता. १६ रात्री आठ वाजल्या पासून सिरली शिवार पिंजून काढण्यास सुरवात केली. त्यामध्ये रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक प्रताप नलगे (रा. सिरली) याच्या शेतात गेले असता त्या ठिकाणी लसूनाच्या पिकात अफूची झाडे लावल्याचे दिसून आले. चार गुंठे जागेत हि झाडे लावली होती. पोलिसांनी सर्व झाडे उपटून त्याचे वजन केले असता सर्व झाडांचे वजन १ क्विंटल ७७ किलो भरले आहे. या अफूची किंमत ३.५४ लाख रुपये आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक घेवारे यांच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी प्रताप नलगे याला ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ पुढील तपास करीत आहेत.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/hingoli/news/vasmat-sirali-afim-plants-seized-one-held-137226976.html