संभाजीनगर महापालिकेचे महापौर, उपमहापौर आज ठरणार:भाजपचे राजूरकर विरुद्ध एमआयएमचे हिवराळे

[%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0 %E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0 %E0%A4%86%E0%A4%9C %E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0 %E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7 %E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87
महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (१० फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता प्रबोधनकार ठाकरे सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे पीठासीन अधिकारी म्हणून सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार असून, आज शहराला नवा महापौर मिळणार आहे. महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. महापौरपदासाठी भाजपकडून समीर राजूरकर आणि एमआयएमकडून अशोक हिवराळे आमनेसामने आहेत. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ आणि एमआयएमचे मोहम्मद वसीम अहमद यांच्यात थेट लढत होणार आहे. ११५ जागांच्या सभागृहात भाजपकडे ५७ जागांचे संख्याबळ असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे. भाजप ५७
एमआयएम ३३
शिवसेना १३
उद्धवसेना ६
वंचित बहुजन आघाडी ४
काँग्रेस १
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)१ निवडणुकीची प्रक्रिया विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार ही सभा पार पडत आहे. मतदानाची पद्धत हात वर करून असून, एकदा दिलेले मत बदलता येणार नाही. सभेचे कामकाज सुरू होताच अर्जांची छाननी केली जाईल आणि वैध उमेदवारांची नावे घोषित केल्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुभा असेल. जर समसमान मते पडली, तर निकालासाठी चिठ्ठीचा वापर केला जाईल. विशेष म्हणजे, ही सभा तहकूब किंवा रद्द करता येणार नाही.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/mayor-and-deputy-mayor-of-sambhajinagar-municipal-corporation-to-be-decided-today-bjps-rajurkar-vs-aimims-hivrale-137167644.html