शरद पवारांना डॉक्टरांचा 5 दिवसांचा रुग्णालयात राहण्याचा सल्ला:दौरे रद्द, भेटींना मनाई, पूर्ण बेड रेस्ट; प्रकृती सुधारतेय, तरीही खबरदारी

[%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6 %E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE %E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE 5 %E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4 %E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%87 %E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6 %E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती स्थिर असून हळूहळू सुधारणा होत असल्याचे समजते. मात्र पूर्णपणे बरे होण्यासाठी त्यांना आणखी पाच दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ते रुग्णालयातच उपचार घेत राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना काही दिवसांपासून छातीत कफ साचल्यामुळे अस्वस्थता जाणवत होती. या स्थितीमुळे श्वास घेताना त्रास होत होता आणि बोलतानाही अडथळा जाणवत होता. त्यांच्या वयोमानाचा विचार करता कोणताही धोका पत्करू नये, या भूमिकेतून त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. लक्षणे गंभीर नसली तरी काळजीपूर्वक उपचार करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. औषधोपचारांद्वारे छातीतील कफ कमी करण्यावर सध्या भर दिला जात आहे. त्यांचा वाढता जनसंपर्क, सततची धावपळ आणि लोकांशी संपर्क लक्षात घेता संसर्गाचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना पूर्ण बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. यामुळे उपचारांना अधिक परिणामकारक प्रतिसाद मिळेल, असा डॉक्टरांचा विश्वास आहे. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असली तरी संसर्ग वाढू नये म्हणून रुग्णालयात भेटीगाठींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. कार्यकर्ते, नेते आणि चाहत्यांना सध्या भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या पाच दिवसांच्या सल्ल्यामुळे त्यांच्या सर्व नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आगामी दौरे, बैठका आणि सार्वजनिक कार्यक्रम तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत. निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, काळजी करण्यासारखे काहीही कारण नाही. फक्त पूर्ण विश्रांती मिळावी आणि उपचारांना योग्य प्रतिसाद मिळावा यासाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असून डॉक्टर त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. पूर्णपणे बरे झाल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, राज्यभरातून कार्यकर्ते आणि विविध नेते त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. अनेकांना भेटण्यासाठी उत्सुकता आहे. मात्र डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे सर्वांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस त्यांना शांतता आणि विश्रांतीची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व सार्वजनिक कार्यक्रम स्थगित पुढील काळात त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून, डॉक्टरांच्या सूचनेनुसारच पुढील निर्णय घेतले जातील. तोपर्यंत शरद पवार यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम स्थगित राहतील. प्रकृतीत सुधारणा होत असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयातच उपचार दिले जात आहेत. कार्यकर्ते आणि नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. रूबी हॉल क्लिनिककडून अधिकृत निवेदन पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकने शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. रुबी हॉलचे फिजिशियन व विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यात सातत्याने सुधारणा होत आहे. त्यांच्या जीवनावश्यक चाचण्या सामान्य मर्यादेत असून एकूण वैद्यकीय स्थिती समाधानकारक आहे. रुग्णालयात दाखल होताना छातीत कफ साचल्याचे निदर्शनास आले होते. मात्र उपचारांना त्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. अलीकडील सततचा प्रवास, शारीरिक ताण आणि लोकांशी वाढता संपर्क यामुळे हा त्रास उद्भवल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. वैद्यकीय देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून पुढील दोन दिवसांत डिस्चार्ज देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी प्रकृतीत अशीच सुधारणा कायम राहणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/sharad-pawar-health-update-ruby-hall-clinic-pune-rest-137177058.html