[%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8 3 %E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE %E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87 %E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE %E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2 %E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B9
चिकलठाणा परिसरातील मूर्तिजापूर येथील म्हाडा कॉलनी परिसरात चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या ३ भिक्षेकरी महिलांना रविवारी (१५ फेब्रुवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नागरिकांनी धाडस दाखवून पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. एका १० वर्षांच्या मुलीच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून तिला सोबत नेण्याचा प्रयत्न या महिलांनी केला. मुलीच्या आईने आरडाओरड केल्यानंतर जमावाने या महिलांना ताब्यात घेतले. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर येथील म्हाडा कॉलनी भागात सकाळी आठपासून ३ ते ४ महिला घरोघरी जाऊन भिक्षा मागत होत्या. त्यांनी दिवसभर सर्व परिसर पिंजून काढला. अनेक घरांमध्ये या महिलांनी शिरण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास एका १० वर्षांच्या मुलीने दारावर आलेल्या यातील एका महिलेला साबुदाणा खिचडी दिली. तेव्हा तिने, ‘तुझ्या गळ्यातील चेन छान आहे, मला दे,’ अशी मागणी केली. तिचा हात पकडून, ‘चल माझ्यासोबत,’ म्हणत ओढत असल्याचे मुलीच्या आईने पाहिले. तिने आरडाओरड केल्यानंतर कॉलनीतील महिला, नागरिक जमले. सर्वांनी मिळून त्या ३ महिलांना पकडून ठेवले. त्यानंतर नगरसेवक मनोज गांगवे, दीपक खोतकर यांना कळविण्यात आले. त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांचे वाहन तेथे पोहोचले. पोलिसांनी ३ महिलांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. या महिला केंब्रिज भागातील मोकळ्या मैदानावर तंबू ठोकून राहत आहेत. त्या शहरातील विविध भागांत दिवसभर घरोघरी जाऊन भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रिक्षा करून आल्या मूर्तिजापूरला महिला रिक्षा करून मूर्तिजापूर भागात सकाळीच आल्या होत्या. भीक मागण्याच्या उद्देशाने भागात फिरत होत्या. अनेक घरांमध्ये यांनी डोकावले. बाहेर खेळणाऱ्या लहान मुलांच्या अंगावरील दागिने घेण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती नागरिकांनी दिल्याचे नगरसेवक मनोज गांगवे यांनी सांगितले.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/attempt-to-kidnap-a-girl-3-beggar-women-detained-girl-dragged-with-a-chain-around-her-neck-in-murtijapur-137218534.html