
आत्तापर्यंतच्या सर्वात मोठा ठरलेल्या मोर्चात मुस्लिम महिलांसह राजकीय व सामाजिक संघटना सामिल
प्रतिनिधी..
गेल्या अनेक दिवसांपासून महिलावरील अन्याय अत्याचारात दिवसेंदिवस सातत्याने वाढ होताना दिसत असुन अन्याय अत्याचार रोखण्यात गृहखाते सपशेल अपयशी ठरल्याचे दिसुन येत आहे.
२००२ साली गुजरात राज्यात बिल्कीस बानो नावाच्या मुस्लिम युवतीवर तेथील ११ आरोपींनी सामुहिक पाश्वी बलात्कार करुन तिच्या कुटुंबातील सर्वांची निर्घृणपणे हत्या केली होती. पिडीत बिल्कीस बानो मयत झाल्याचे पाहुन आरोपींनी तेथुन पलायन केले होते.
मात्र या सर्व घटनेतुन बानो हि वाचल्याने तिने पोलीस स्टेशन गाठुन आरोपीविरुद्ध तक्रार दिल्याने कोर्टात सदरील ११ आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा व बलात्काराचा आरोप सिद्ध होवुन न्यायालयाने वरील सर्व ११ आरोपींना सश्रम अजिवन कारावासाची शिक्षा ठोठावली असताना गुजरात राज्य सरकारने या गुन्ह्यातील आरोपींची वागणूक चांगली असल्याचे कारणावरून सर्वच्या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने या निर्णयाविरोधात देशातील मुस्लिम समाजात असंतोष पसरला असुन हा दिलेला निर्णय संविधानाच्या विरोधात आणि लोकशाही पायदळी तुडवत हुकुमशाही पध्दतीने दिला असल्याची खंत व्यक्त करत सर्व महाराष्ट्रभर मुस्लिम समाजासह ईतर ही पक्ष व संघटना या निर्णया विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.
त्याच अनुशंगाने केज शहरातही, दि. १५ सप्टेंबर गुरुवार रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
हा मोर्चा हजरत ख्वाजा मोहजबोद्दिन रहे-दर्गा ते तहसील कार्यालय असा काढण्यात आला. या मोर्चात अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने
बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार करणाऱ्या व त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या ११ जणांची केलेली सुटका रद्द करून त्यांना पुन्हा कठोर शिक्षा द्यावी
हजरत मोहम्मद यांच्या विषयी प्रत्येक वेळी अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करून त्यासाठी कठोर कायदा लागू करावा.
भारतातील अल्पसंख्यांक समुदायावर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध कडक कायदा करावीया प्रमुख मागण्यांसाठी केज संविधान संघर्ष बचाव समितीच्या वतीने गुरुवार दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता.
हजरत ख्वाजा मोहजबोद्दिन रहे-दर्गा पासुन तहसिल कार्यालयावर हातात काळे झेंडे घेवुन महिलांचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता. केज शहरातील निघालेल्या महीलांच्या सर्वात मोठ्या निषेध मोर्च्याने केज शहर हादरून गेले होते. या मोर्चाची सुरुवात ख्वाजा मोहजबोद्दिन रहे-दर्गा येथून सुरुवात करण्यात आली. तर हा मोर्चा दुपारी १२:०० वा. केज तहसील कार्यालयावर धडकला नंतर या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.
या मोर्चात मुस्लिम महिलासह पुरुष व विद्यार्थी ही हाजोरोच्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाला सर्वपक्षीय पाठिंबा दिल्याने केज शहरातील आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा आणि शांततामय मोर्चा ठरला आहे.
हा मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चात जनविकासचे सर्वेसर्वा हारुणभाई ईनामदार , नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड , हानुमंत भोसले, आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर या मोर्चाला शिवसंग्राम व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) , आणि ईतर सामाजिक तसेच राजकीय पक्षा सह सामिजीक संगठनानी ही भक्कम पाठिंबा दिला. या मोर्चातील मागण्यांचे निवेदन केज तहसीलचे नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. लक्ष्मण धस यांना देण्यात आले. व मोर्चा शांततेत पार पडला.
-
दिल्ली दंगल कट प्रकरण: जामिनासाठी उमर खालिदची पुन्हा उच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): २०२० च्या दिल्ली दंगल कट प्रकरणात (Delhi Riots Conspiracy Case) तुरुंगात असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याने जामिनासाठी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर ३१ जुलै रोजी न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह आणि न्यायमूर्ती विकास महाजन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. कनिष्ठ न्यायालयाने फेटाळला होता जामीन: यापूर्वी ४ जुलै…
-
तेलंगणा ‘आरटीआय’ पोर्टलचा फज्जा! केवळ २.१ टक्के अर्जांवर कारवाई; विद्यार्थ्याची थेट उच्च न्यायालयात धाव
२५०२ पैकी एकाही अपिलाचा निपटारा नाही; राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश हैदराबाद (वृत्तसंस्था): तेलंगणा सरकारच्या माहितीचा अधिकार (RTI) ऑनलाइन पोर्टलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या पोर्टलवरून दाखल करण्यात आलेल्या एकूण आरटीआय अर्जांपैकी केवळ २.१ टक्के अर्जांवरच कारवाई करण्यात आल्याची धक्कादायक बाब एका जनहित याचिकेतून समोर आली आहे. तसेच, पोर्टलद्वारे करण्यात आलेल्या २५०२…
-
शिवपूर जि. प. शाळेचे मुख्याध्यापक गुरुनाथ शिंदाळकर सेवानिवृत्त;
३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवापूर्ती सत्कार संपन्न शिवपूर (प्रतिनिधी): येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गुरुनाथ शिवराज शिंदाळकर हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने गुरुवारी (दि. ३०) त्यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रात तब्बल ३५ वर्षे अविरत सेवा दिल्यानंतर ते निवृत्त झाले असून, याप्रसंगी त्यांच्या कार्याचा गौरव करत मान्यवरांच्या हस्ते त्यांचा…
-
राहुल गांधींचा अमित शहांवर गंभीर आरोप: “पोलिस अत्याचारासाठी गृहमंत्रीच जबाबदार, त्यांनी राजीनामा द्यावा”
नवी दिल्ली (वर्तमान महाराष्ट्र वृत्तसेवा): “विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या अमानुष लाठीचार्ज आणि अत्याचाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह हेच पूर्णपणे जबाबदार आहेत. जर हा हल्ला त्यांनी स्वतः आदेश देऊन घडवून आणला असेल तर ते गुन्हेगार आहेत, आणि जर त्यांच्या नकळत हे घडले असेल तर ते गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अक्षम आहेत. दोन्ही परिस्थितींमध्ये त्यांनी आपल्या पदावर राहता कामा…
-
पिंपरीतील वाकड: १० वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ६५ वर्षीय नराधम अटकेत
पिंपरी (वार्ताहर): वाकड परिसरात जिवे मारण्याची धमकी देऊन दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ६५ वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, शिवाजीनगर न्यायालयाने त्याला ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रमजान बन्नूसाब बागवान (वय ६५, रा. ताथवडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी…











