पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना आता पुन्हा मिळेल योजनेचा लाभ

[copy of db temp photo resize marathi 2026 02 01t09 1769919277
ई केवायसी ऑनलाइन प्रक्रिया करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने जिल्ह्यातील ८६ हजार २७० पात्र महिला अपात्र ठरल्या आहेत. या महिलांच्या पडताळणीचे काम ३१ जानेवारी पासून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू करण्यात आले असून सेविकांना हे काम आपल्या कामाची जबाबदारी सांभाळून घरोघरी जाऊन पडताळणीचे काम करावे लागणार असल्यामुळे सेविकेवरील कामाचा ताण अधिक वाढला आहे. अपात्र ठरलेल्या व पडताळणी करावयाच्या महिलांच्या नावांची यादी सेविकांना महिला व बालविकास कार्यालयाकडून देण्यात आली आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात ऑगस्ट २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी कालांतराने अटी व शर्ती ठेवण्यात आल्या त्याचे तंतोतंत पालन आता शासनाने सुरू केले आहे. ६८ हजार महिलांची ई-केवायसी चुकली. कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकरीत आहे किंवा पेन्शन घेतो काय? असा पर्याय होता तो निवडला गेला. तर ६५ वर्षापेक्षा वय जास्त असलेल्या ९४७३ तर २१ पेक्षा कमी वय असलेल्या ३२१८ तसेच नाव महिलांचे व आधार कार्ड पुरुषांचे असे ५५८ लाभार्थी आहेत. अशांचा लाभ बंद झालेल्या महिलांची यादी महिला व बालविकास विभागाकडून तालुकास्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे दिली. अमोल डिघुळे, महिला व बाल विकास अधिकारी, बुलडाणा या बाबींची होणार आहे आता पडताळणी अंगणवाडी सेविकांना लाभार्थींचे वय वर्षे २१ पेक्षा कमी व ६५ वर्षापेक्षा जास्त आहे का ? लाभार्थी केवळ पात्र महिला आहे की पुरुष ? लाभार्थींच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी उपक्रम मंडळ,भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे का? किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे का? या बाबीची पडताळणी सेविकांना करावी लागणार असून आणि तशी माहिती भरून संबंधित कार्यालयास सादर करावी लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी अनुषंगाने ईकेवासी पडताळणी करावयाच्या बुलडाणा जिल्ह्यातील लाभार्थींची माहिती गुगल ड्राईव्ह द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुलडाणा ७०२८, चिखली ६५५९, देऊळगावराजा २९८८, जळगाव जामोद ३६२८, खामगाव ८६८५, लोणार ४०९०, मलकापूर ४६३२, मेहकर ८०४७, मोताळा ४८०३, नांदुरा ४५०८, संग्रामपूर ३५३८, शेगाव ४६२४ व सिंदखेडराजा ५१४०
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/dear-sisters-who-are-eligible-will-now-get-the-benefit-of-the-scheme-again-137094075.html