चांदूर बाजारमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त:निंभोरा येथे महसूल विभागाची धडक कारवाई, तस्करांमध्ये खळबळ

[%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0 %E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87 %E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7 %E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82 %E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95 %E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE %E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0 %E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE %E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B2
चांदूर बाजार तालुक्यात महसूल विभागाने अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी रात्री निंभोरा येथे वाळूची अवैध वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव आणि तहसीलदार मनोज सोनारकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून वाळूची अवैध वाहतूक पकडण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून निंभोरा परिसरात रात्रीच्या वेळी वाळूची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीची खात्री पटल्यानंतर संबंधित ठिकाणी पथक तैनात करण्यात आले होते. वाळूने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक एमएच २९, बीसी ३७६३ महसूल पथकाने जप्त केला. प्राथमिक चौकशीतून ही वाळू कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी विलास ढोले, जगदीश पानसे, प्रतिक चव्हाण आणि पद्माकर झळके यांचा सहभाग होता. जप्त केलेला ट्रॅक्टर आणि वाळू महसूल विभागाने ताब्यात घेतली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. महसूल विभागाने अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांनीही महसूल विभागाच्या या कारवाईचे स्वागत केले असून, भविष्यातही अशाच कठोर कारवाया करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/news/nimhbra-illegal-sand-transport-tractor-seized-chandur-bazar-137181264.html