[
गिरिप्रेमी संस्थेच्या माजगाव येथील नव्या कॅम्पस प्रकल्पाच्या अधिकृत प्रारंभाची घोषणा पुण्यात करण्यात आली. यावेळी गिर्यारोहण क्षेत्रातील अनेक मान्यवर, मार्गदर्शक आणि हितचिंतक उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रख्यात उद्योगपती आणि संस्थेचे मार्गदर्शक डॉ. प्रमोद चौधरी, परिमल चौधरी आणि पार्थ चौधरी यांनी गिरिप्रेमीच्या गिर्यारोहण प्रशिक्षण केंद्र प्रकल्पासाठी 1 कोटींची देणगी जाहीर केली. त्यांनी संस्थेच्या विविध इमारती व विभागांना भारतीय दिग्गज गिर्यारोहकांची नावे देण्याची सूचनाही केली. डॉ. चौधरी यांच्या सूचनेचा मान राखत, डायनिंग हॉल विभागाला ज्येष्ठ गिर्यारोहक कै. एन. के. उर्फ आबासाहेब महाजन यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तसेच अँफीथिएटरला भारतीय सैन्य दलातील दिग्गज गिर्यारोहक कर्नल नरेंद्र “बुल” कुमार यांचे नाव देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, गणेश जाधव व राजेंद्र आवटे (गंगोत्री होम्स) यांनी 5 लाखांची देणगी जाहीर केली. राहुल नरुटे (सीएमडी, एशियन मशीन टूल्स कॉर्पोरेशन प्रा. लि.) यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने दरवर्षी 2 लाख असे सहा वर्षे देण्याची घोषणा केली. एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी 1 लाखांचा हातभार लावला. संस्थेचा संकल्प आहे की, भारतातील सर्वात मोठे समर्पित गिर्यारोहण प्रशिक्षण केंद्र सह्याद्रीच्या कुशीत तोरणा व राजगड किल्ल्याच्या परिसरामध्ये माजगाव, ता. राजगड, जि. पुणे येथे उभारले जाईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उद्योगजगत, सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. संस्थेचे संस्थापक संचालक उमेश झिरपे यांनी विश्वास व्यक्त केला की, हा प्रकल्प पुढील पिढ्यांसाठी शिस्तबद्ध, तांत्रिक आणि मूल्याधिष्ठित गिर्यारोहण प्रशिक्षणाचे शाश्वत केंद्र ठरेल.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/dr-pramod-chaudhari-1-crore-donation-giripremi-majgaon-campus-137178639.html
मुख्यपृष्ठ वर्तमान महाराष्ट्र ताज्या बातम्या गिरिप्रेमीच्या माजगाव कॅम्पसची अधिकृत घोषणा:डॉ. प्रमोद चौधरींकडून 1 कोटींची देणगी जाहीर; डायनिंग...














