अजित पवारांच्या नावाने संभाजीनगरमध्ये क्रीडा संकुल उभारणार:मंत्री अतुल सावे यांची घोषणा, विविध क्रीडा संघटनांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

[%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4 %E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87 %E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87 %E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE %E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2 %E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80 %E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2 %E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87 %E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80
छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी अजित पवार यांच्या नावाने छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा केली. मंत्री अतुल सावे, जे महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्षही आहेत, यांनी अजित पवार यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे आधुनिक व सर्वसुविधायुक्त क्रीडा संकुल उभारले जाईल, असे त्यांनी सांगितले. या घोषणेमुळे क्रीडा क्षेत्रात सकारात्मक प्रतिसाद उमटला. या शोकसभेला महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्रीकांत जोशी, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष किशोर पाटील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या शिखर समितीचे अध्यक्ष सचिन मुळे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव डॉ. उदय डोंगरे आणि छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे उपस्थित होते. त्यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. शोकसभेच्या यशस्वी आयोजनात छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक असोसिएशन आणि संलग्न विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये कबड्डी, टेनिकॉइट, खो-खो, क्रीडा शिक्षक संघटना, क्रीडा-भारती, क्रिकेट अंपायर, सॉफ्टबॉल, तलवारबाजी, हॉकी, बॉक्सिंग, ड्रॉप रो बॉल, वॉलीबॉल, हँडबॉल, बेसबॉल, ॲथलेटिक्स संघटनांचे प्रतिनिधी तसेच सैनिकी शाळेचे प्राध्यापक, क्रीडा उपसंचालक कार्यालयातील अधिकारी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते. यावेळी क्रीडा क्षेत्राच्या वतीने दिवंगत अजित पवार यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मोठ्या संख्येने खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, क्रीडा प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी नागरिक शोकसभेला उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांचे महाराष्ट्रातील क्रीडा चळवळीला दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त केली.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/chhatrapati-sambhajinagar-sports-complex-ajit-pawar-atul-savenamesake-announcement-137096022.html