[
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आगामी १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत परळी वैजनाथ (जि. बीड) येथे आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्सपो २०२६ या प्रदर्शनाच्या अधिकृत लोगोचे अनावरण आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व अर्पित चौहान यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावणे, पशुसंवर्धनसहाय्यक आयुक्त डॉ. विलास पावडे, डॉ. राजेश निचळ तसेच इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. लोगो अनावरणानंतर संवाद साधताना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले की, पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परळी वैजनाथ येथे होणारे हे प्रदर्शन देशातील जातिवंत पशुधन व आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालक, तरुण उद्योजक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट देऊन आपले ज्ञान व उत्पन्न वाढवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यासाठीसंपूर्ण जिल्ह्यात प्रदर्शनाची व्यापक प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येणार असून, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे नियोजन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी व शेतकरी बांधवांनी या महोत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. दर्यापूर | शहरातील साईनगर येथे संत श्री गजानन महाराज यांच्या १४७ व्या प्रकट दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही सोमवारी सायंकाळी हरिपाठ व भक्त गणांच्या उपस्थितीत सामुहिक महाआरती करण्यात आली. यावेळी आतषबाजी करून गण गण गणात बोतेचा गजर करण्यात आला. दरम्यान दिंडी पथकातील सहभागी सर्व भजन मंडळ व कला पथकाला नारळ-टोपी देऊन श्री साई गणेश मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. महाआरती नंतर रात्री ८ वाजतापासून शेकडो भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने झुनका-भाकर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साईनगर परिसरातील महीला-पुरुष व युवकांनी अथक परिश्रम घेतले. एकंदरीतच भक्तीमय,सुसज्ज नियोजनात श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात संपन्न झाला.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/news/official-logo-of-39all-india-livestock-and-poultry-maha-pashudhan-expo39-unveiled-guidance-to-farmers-through-exhibition-137193298.html
मुख्यपृष्ठ वर्तमान महाराष्ट्र ताज्या बातम्या ‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्सपो’च्या अधिकृत लोगोचे अनावरण:प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन













