(प्रतिनिधी – जगदीप वनशिव)

पुणे – स्वारगेट येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या सभागृहात ‘एस जी फिल्म’ प्रस्तुत आणि ‘सूर पुराने आवाज नई’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिमाखदार सोहळा पार पडला. समाजवादी विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ कै. रामचंद्र जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात एस जी फिल्म प्रोडक्शनचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कृतज्ञता गौरव पुरस्कार २०२६ प्रदान

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे डॉ. अण्णा भाऊ साठे फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. विठ्ठल सोनावणे यांना प्रदान करण्यात आलेला ‘कृतज्ञता गौरव पुरस्कार २०२६’. अखिल भारतीय आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य यांच्या हस्ते शाल, पुष्पहार, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थित

याप्रसंगी व्यासपीठावर राहुल जाधव, शरद जावडेकर (अध्यक्ष, अ.भा. शिक्षण हक्क सभा), श्रीमती जाधव, सौ. शारदा जाधव, नितीन पवार (अध्यक्ष, रिक्षा संघटना पुणे), ज्येष्ठ पत्रकार व रानकवी जगदीप वनशिव, जनाबापू पुणेकर, जगन्नाथ कांबळे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

काव्य आणि गीतांची मेजवानी

प्रथम सत्र: ‘बाप’ या विषयावर आधारित काव्यमैफल रंगली. या सत्राचे अध्यक्षपद गझलकार म. भा. चव्हाण यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून वि. ग. सातपुते, अरुण कटारे, प्रा. प्रतिमा काळे, डॉ. मदन देगावकर, किशोर टिळेकर, प्रा. सूर्यकांत नामगुडे, अनिल नाटेकर, प्रल्हाद शिंदे मामा व आत्माराम हारे सहभागी झाले होते. कविता काळे यांनी या सत्राचे बहारदार सूत्रसंचालन केले.

दुसरे सत्र: या सत्रात जुन्या आणि नव्या मराठी-हिंदी चित्रपटांतील गीतांची मैफल सजली. गाण्यांच्या या सुरावलींनी वर्धापन दिनाचा आनंद द्विगुणित केला.