कालकथीत तेजस मेघा डोळस यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

माजलगाव प्रतिनिधी :- छत्रपती संभाजी नगर येथील मौलना आझाद संशोधन केंद्र या हॉलमध्ये तेजस फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर येथे तेजस फाउंडेशन नाशिक कालकथीत तेजस मेघा डोळस यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2024 प्रसंगी मा.श्री नितीनजी देशमुख साहेब मा. आशिष पुंडलिक सातपुते कॉमेडी कलाकार मा मेघा डोळस अध्यक्ष तेजस फाउंडेशन नाशिक सिने अभिनेत्री व चित्रपट निर्माती मा कडूबाई खरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मा सौ मानसी मंदार राणे अभिनेत्री लेखिका व संमुपदेशक मुंबई यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार संपादक बालासाहेब दामोधरराव फपाळ पाटील यांना प्रदान करण्यात आला.नाशिक आयोजित कलाकथीत तेजस मेगा डोळसकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2024 मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये आदर्श डॉक्टर आदर्श पत्रकार सामाजिक राजकीय औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक अशा अनेक पुरस्कार करताना शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन पुढील आयुष्यात जोमाने व उत्साहाने काम करण्यासाठी प्रोत्साहन पर शब्बासकीची थाप या तेजस फाउंडेशन नाशिक आयोजित कलाकथीत तेजस मेगा डोळसकर यांच्या वतीने देण्यात येते या वर्षीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार माजलगाव तालुक्यातील बेलुरा गावचे भूमिपुत्र ह मु तेलगाव येथे वास्तव्यास असणारे सामाजिक राजकीय व वारकरी संप्रदायातील काम करणारे संपादक तथा ग्रंथालय विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष श्री बालासाहेब दामोधर फपाळ पाटील यांना देण्यात आला त्याप्रसंगी संपादक बांधव पत्रकार बांधव व रोजगार व स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष विजय दादा पोकळे व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या











