शब्दांच्या बहारदार वर्षावाने रंगली काव्यमैफल; हडपसर कला परिवाराचे पहिले खुले मराठी कवी संमेलन उत्साहात संपन्न

​सामाजिक, शेतकरी व निसर्ग कवितांनी जिंकली रसिकांची दाद; मान्यवर कवी-साहित्यिकांचा गौरव

​प्रतिनिधी : जगदीप वनशिव

पुणे : ​शब्दांची समृद्धी, प्रबोधनाची धार आणि विविध रसांची उधळण करत ‘कला परिवार हडपसर’ यांच्या वतीने आयोजित पहिले खुले मराठी कवी संमेलन मोठ्या उत्साहात व साहित्यिक वातावरणात पार पडले. पुणे येथील तुकाई पायथा परिसरातील संत नामदेव सभागृहात हा काव्यसोहळा रंगला. या संमेलनासाठी पुणे शहर, परिसरासह राज्यभरातून अनेक नामवंत कवी, साहित्यिक आणि रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली.

​कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने अत्यंत मंगलमय वातावरणात करण्यात आला. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ह.भ.प. सुभाष बडधे महाराज विराजमान होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक चंद्रकांत जोगदंड, उमा लुकडे, दशरथ दुनघव आणि प्रा. गौरव नेवसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

​विविध रसांतील कवितांनी रसिक मंत्रमुग्ध

1000076366

या काव्य संमेलनात सहभागी कवींनी सामाजिक वास्तव, शेतकऱ्यांचे प्रश्न, निसर्गसौंदर्य, मराठी भाषेचा गौरव, विडंबन, आध्यात्मिक अभंग तसेच भावस्पर्शी प्रेमभावना अशा अनेकविध विषयांवर आधारित स्वरचित कविता सादर केल्या. कवींच्या एकापेक्षा एक सरस रचना आणि प्रभावी सादरीकरणामुळे सभागृहातील रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. अनेक कवितांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार दाद दिली.

​कवी-कवयित्रींचा सहभाग व सन्मान

1000076365

या खुल्या काव्य संमेलनात कवी दिलीप मोरे, सोमदत्त कुलकर्णी, बाळासाहेब केमकर, अनंत कालकुंद्री, शाहीर शिवाजीराव थिटे, बालकवी श्रीकांत ढोबळे, महेश उंबर्गीकर, विजय रसाळ, सौ. संगीता बोराटे, प्रल्हाद भालेराव, संतोष कुंभार, उत्तमराव तुळलकरी, दत्तात्रय कुलकर्णी, सौ. सुनिताताई चौरे, नानाभाऊ माळी, स्नेहा भोसले, ह.भ.प. सुभाष बडधे महाराज आणि अमोल भोंगळे यांनी आपल्या बहारदार रचना सादर करून मैफल सजवली. सहभागी सर्व कवींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

​उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार

या संपूर्ण काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन महाराष्ट्रातील प्रसिद्ध रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या ओघवत्या आणि काव्यमय शैलीत प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्य आयोजक कवी व गायक दिलीप मोरे यांनी सर्व कवी, पाहुणे आणि रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles