More

    कळवण तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा विस्तार; हिंगळवाडी व भेंडी येथे ग्राम शाखांचे थाटात उद्घाटन

    Published on:

    ​नाशिक (वर्तमान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क):

    कळवण तालुक्यातील हिंगळवाडी आणि भेंडी या गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नवीन ग्राम शाखांचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. आगामी काळात कळवण तालुक्यासह संपूर्ण नाशिक पूर्व जिल्ह्यात गाव तिथे शाखा बांधून पक्षसंघटन अधिक मजबूत व व्यापक करण्याचा दृढ निर्धार यावेळी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

    ​गाव तिथे शाखा उभारून संघटन बळकट करणार

    ​कळवण तालुक्यातील ग्रामीण भागात वंचित बहुजन आघाडीचे विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून हिंगळवाडी आणि भेंडी येथे अधिकृत ग्राम शाखांची स्थापना करून फलकांचे अनावरण करण्यात आले.

    ​या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्वसामान्यांचे, शोषितांचे आणि वंचितांचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मजबूत संघटन ही काळाची गरज आहे. यासाठी नाशिक पूर्व जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम शाखा स्थापन करून कार्यकर्त्यांचे जाळे विणले जाईल.

    ​प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

    ​या उद्घाटन सोहळ्याला नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दीपक पवार, जिल्हा उपाध्यक्ष राम बस्ते, जगदीश खरे, प्रकाश बस्ते आणि तालुका अध्यक्ष कुणाल पिंपळे यांच्यासह पक्षाचे विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान दोन्ही गावांतील नवनिर्वाचित शाखा पदाधिकाऱ्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here