मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026
जाहिरातीसाठी संपर्क
वर्तमान महाराष्ट्र
⌕
ब्रेकिंग न्यूज
प्रशासन

पुणे: ‘श्रीराम नवमी’ निमित्त शहराच्या वाहतूक नियोजनात मोठे बदल; बाजीराव रस्ते आणि लष्कर भागातील वाहतूक वळवली

सांकेतिक चित्र: वर्तमान महाराष्ट्र

​पुणे: शहरात गुरुवारी (दि. २६ मार्च) ‘श्रीराम नवमी’ सणानिमित्त बाजीराव रोड आणि लष्कर (कॅम्प) भागात मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकांदरम्यान वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले असून, दुपारी ४:०० वाजल्यापासून मिरवणुका संपेपर्यंत वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

​पोलीस उप-आयुक्त (वाहतूक शाखा) हिंमत जाधव यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​वाहतुकीतील प्रमुख बदल खालीलप्रमाणे:

​१) बाजीराव रोड (विश्रामबाग वाहतूक विभाग):

  • ​पुरम चौकातून बाजीराव रोडने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेश बंद करण्यात येईल.
  • ​पर्यायी मार्ग: ही वाहने पुरम चौकातून डावीकडे वळून टिळक रोड – अलका टॉकीज चौक – खंडोजी बाबा चौक मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील.

​२) लष्कर वाहतूक विभाग (कॅम्प परिसर):

  • ​वाय जंक्शन: वाय जंक्शनवरून एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक बंद राहील.
  • ​१५ ऑगस्ट चौक: मिरवणूक ट्रायलक हॉटेलच्या पुढे गेल्यास एम.जी. रोडवरील वाहतूक १५ ऑगस्ट चौकापासून डावीकडे वळवण्यात येईल.
  • ​महमंद रफी चौक: मिरवणूक या चौकाच्या पुढे गेल्यानंतर एम.जी. रोडवरील वाहतूक उजवीकडे ईस्ट स्ट्रीट रोडकडे वळवण्यात येईल.
  • ​कोहिनूर हॉटेल: मिरवणूक पुढे गेल्यावर कोहिनूर हॉटेलकडून एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक बंद करून ती भोपळा चौक, कुरेशी मशीद आणि सेंटर स्ट्रीट मार्गे वळवण्यात येईल.
  • ​धोल्गा चौक: धोल्गा चौकाकडून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक मिरवणुकीच्या मार्गानुसार बंद राहील. ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडली जाईल.

​अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका) यांना या निर्बंधातून सवलत देण्यात आली आहे. मिरवणूक काळात नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

वर्तमान महाराष्ट्र

आपली प्रतिक्रिया नोंदवा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत