बुधवार, 25 नोव्हेंबर 2026
जाहिरातीसाठी संपर्क
वर्तमान महाराष्ट्र
⌕
ब्रेकिंग न्यूज
शैक्षणिक

एमबीबीएस पदवी प्राप्त डॉ. गीता शिनगारे यांचा आवसगाव येथे जिजाऊ परिवारातर्फे भव्य सत्कार

​बीड (वृत्त सेवा):

केज तालुक्यातील मौजे आवसगाव येथील कन्या डॉ. गीता बन्सी (आण्णा) शिनगारे यांनी एमबीबीएस पदवी संपादन करून मिळवलेल्या देदीप्यमान यशाबद्दल त्यांचा राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मराठा सेवा संघ (बीड जिल्हा) आणि जिजाऊ परिवाराच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. गुरुवारी, १६ एप्रिल रोजी आवसगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा गौरव सोहळा पार पडला.

​कठोर परिश्रमातून मिळवले यश

डॉ. गीताताई शिनगारे यांनी अमरावती येथील नामांकित डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. ग्रामीण भागातील मुलीने वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण गावात अभिमानाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी जिजाऊ परिवाराच्या महिला पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे औक्षण करण्यात आले.

​मान्यवरांच्या हस्ते गौरव

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गोविंद नाना शिनगारे, संतोष बापू शिनगारे आणि सुरेशराव खाडपे यांच्या हस्ते डॉ. गीताताई यांना स्वराज्य प्रेरणा राजमाता जिजाऊ माँसाहेबांची प्रतिमा, शाल आणि पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. गीताताईंच्या यशाचे कौतुक करतानाच त्यांनी भविष्यात समाजातील गरजू रुग्णांची सेवा करण्यासाठी तत्पर राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

​ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

या सत्कार समारंभाला डॉ. गीताताईंचे वडील बन्सी (आण्णा) शिनगारे व संपूर्ण शिनगारे परिवार उपस्थित होता. तसेच भारत दादा शिनगारे, सुरेश खाडपे, काशिनाथ बाबा साखरे, माजी सरपंच गोविंद पवार, विजयसिंह साखरे, कृष्णा साखरे, अ‍ॅड. सयाजी साखरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे अध्यक्ष आकाश भैय्या आदमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

​डॉ. निता शिनगारे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. गीता यांच्या यशामागे त्यांचे आई-वडील, कुटुंबीय आणि गुरुजनांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. डॉ. गीता शिनगारे यांनी देखील या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. या सोहळ्यासाठी आवसगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

आपली प्रतिक्रिया नोंदवा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत