वर्तमान महाराष्ट्र प्रतिनिधी: पुणे जिल्हा विशाल जयद्रथ सरवदे
पिंपरी :- मोजमजेसाठी दुचाकी चोरून त्याची विक्री करणाऱ्या दोन जणांना निगडी पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून ३० चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत त्या मुळे २७ गुन्हे उघडकीस आले आहेत रामा उर्फ कविराज ज्ञानोबा केंद्रे वय(२८) आणि अविनाश तुकाराम होळंबे वय (२८)दोघेही रा.मु खोकलेवाडी पो.सुपा.ता. गंगाखेड जि.परभणी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार निगडी पोलीस ठाण्यातील एक वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक अमरीश देशमुख यांनी ३०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पुन्हा दाखल केलेल्या दोन संशयीत आरोपीबद्दल माहिती मिळाली
चोरीच्या ३० दुचाकी हस्तगत
निगडी पोलीस ठाण्यातील अंमलदार दत्ता शिंदे सुनील पवार प्रवीण बांबळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथून आरोपी राम केंद्रे आणि त्याचा साथीदार अविनाश होळंबे याला ताब्यात घेतले त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली त्या दोघांनी मिळून १५ दुचाकी चोरून नेण्यासाठी चिखली परिसरातील एक पडीक जागेत लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले तसेच काही दुचाकी त्यांच्या मूळगावी विक्री केल्याचेही सांगितले पोलिसांनी चोरीचे वाहने विक्री केलेल्या दोन एजेंटला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाक्या हस्तगत केल्या आरोपींना अटक झाल्याची बातमी त्यांचे मुळगाव परिसरात कळल्यामुळे अनेक ग्राहकांनी गाड्या त्यांच्या दारात आणून बेवारस लावल्या चोरीच्या दहा दुचाकी
डुप्लिकेट चावी ने करायचे चोरी
सदर दोन्ही आरोपी हे एकमेकाचे नातेवाईक असून ते काही काळ चिखली परसरात वास्तव्यास होते दरम्यान त्यांच्याकडे असलेल्या डुप्लिकेट चाविले ज्या मोटरसायकलला ति चावी बसेल ती मोटार सायकल चोरी करून त्या गाड्या निर्जन स्थळी लावून मागणीप्रमाणे गावाकडे येऊन विक्री करून पुन्हा पुण्यात येऊन वेल्डिंगचे काम करत होते तसेच गावी येताना जाताना लागणाऱ्या भागातून सुद्धा ते मोटरसायकल चोरी करत असे
आरोपीकडून उघडकीस आलेले पोलीस ठाण्यानिहाय २७ गुन्हे
निगडी (४) चिखली (४) हिंजवडी (४) पिंपरी (१)वाकड (२)आळंदी (१)दिघी(१) चतुर्श्रुंगी (१) रांजणगाव एमआयडीसी (१) रांजणगाव (१)हवेली (१)लातूर शिवाजीनगर (२) बीड अंबाजोगाई (१) मीरा रोड (१) खालापूर (१)
या पथकाने केली कामगिरी
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सह आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर आयुक्त वसंत परदेशी उपायुक्त स्वप्ना गोरे सहाय्यक आयुक्त मुकुटलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शत्रुघन माळी निलेश वाघमारे सहाय्यक निरीक्षक अमरीश देशमुख पोलीस आमदार भगवान नागरगोजे राहुल गायकवाड सुधाकर अवताडे सिद्राम बाबा विनोद होनमाने दत्तात्रय शिंदे स्वप्निल पाचपांडे तुषार गेंजगे विनायक मराठी सुनील पवार दीपक पिसे प्रवीण बांबळे केशव चेपटे नूतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे
