मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026
जाहिरातीसाठी संपर्क
वर्तमान महाराष्ट्र
⌕
ब्रेकिंग न्यूज
वर्तमान महाराष्ट्र

‘जीवनवेल’ काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा व काव्यमेळावा संपन्न

जीवनवेल काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा व काव्यमेळावा संपन्न

प्रतिनिधी- जगदीप वनशिव
नाशिक – येथील नाशिक कवी संस्थेचा काव्यमेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक कवी संस्थाचे अध्यक्ष बाळासाहेब मगर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक, चारोळीकार दिलीप बारावकर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण मेतकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे यांनी करून दिला. तर नाशिक कवी संस्थेची भूमिका सुभाष सबनीस यांनी विषद केली. जवळपास ३२ कविंनी आपल्या रचना सदर केल्यात.

कवी रमेश चौधरी यांच्या “जीवनवेल” या काव्यसंग्रहचे प्रकाशन उपस्थित मान्यवा्रांच्या शुभहस्ते झाले. प्रास्ताविक नंदकिशोर ठोंबरे यांनी केले तर प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष गझलकार कवी बाळासाहेब गिरी यांनी केले. कवी रमेश चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. यशवंत पाटील सर यांचे काव्यसंग्रहास ब्लर्ब लाभले आहे. त्यांनी याप्रसंगी काव्यसंग्रह बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर बाळासाहेब मगर, दिलीप बारावकर, सुभाष सबनीस, डॉ यशवंत पाटील, नंदकिशोर ठोंबरे, किरण मेतकर, आणि रमेश चौधरी होते.

यावेळी सादर केलेल्या रचनातून अशोक भालेराव, राजेश जाधव, संतोष जोशी, सौ. अनार देवरे, योगेश जाधव यांच्या रचना उत्कृष्ट ठरल्यात त्याना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. खालील कविंनी आपल्या रचना सादर केल्या
संजय आहेर, रमेश चौधरी, रविकांत शार्दूल, सोनाली चव्हाण, शुभांगी भोकरे, सुरेश देवरे, शिवराज शिरसाठ, रेखा सोनवणे, राजेश जाधव, सुधीर कुलकर्णी, मृणाल प्रभुणे, रेखा नाशिककर, कविता कासार, संदीप बद्दर, सुभाष उमरकर, योगेश जाधव, कविता बिरारी, डॉ. यशवंत पाटील, माधव जोशी, साहेबराव उगले, अशोक भालेराव, उज्जवला वडनेरे. अध्यक्ष बाळासाहेब मगर यांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला आणि जीवनवेल काव्यसंग्रहतील कविता वाचून दाखवली. आभार प्रदर्शन किरण मेतकर यांनी केले.
नाशिक येथील नाट्य परिषद हॉल कालिदास कला मंदिर येथे कार्यक्रमाची सांगता झाली.


वर्तमान महाराष्ट्र

आपली प्रतिक्रिया नोंदवा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत