More

    कर्तव्यदक्ष सहाय्यक अभियंता आर. आर. थावरे यांनी घेतली पत्रकारांच्या फोनची दखल

    Published on:

    IMG 20220625 WA0003

    कर्तव्यदक्ष सहाय्यक अभियंता आर. आर. थावरे यांनी घेतली पत्रकारांच्या फोनची दखल
    माजलगाव / प्रतिनिधी
    तालुक्यातील पात्रुड या गावी विजेचा लपंडाव हमेशा चालत असतो. परंतु गेल्या अनेक दिवसापासून दर्गा वन, बम्बई टू, व बेस या ठिकाणचे सिंगल फेज ट्रांसफार्मर जळाले होते. याबाबत येथील रहिवाशांनी ग्रामपंचायत सदस्यांना अनेक वेळी या बद्दल तोंडी तक्रारी केल्या परंतु याविषयी कसल्याही प्रकारची त्यांनी दखल घेतली नाही. परंतु पाञुड येथील पत्रकारांना काही नागरिकांनी याबाबत सविस्तर माहिती सांगितली व या विषयी विनंती केली.
    या विषयी पत्रकार नईम अतार यांनी सहाय्यक अभियंता आर.आर. थावरे यांना फोन द्वारे विचार ना केली असता त्यांनी फोनची दखल घेत तात्काळ तीन सिंगल फेज ट्रांसफार्मर उपलब्ध करून दिले. व तात्काळ दर्गा वन, बंबईया टू, व बेस या ठिकाणी कामास सुरवात करण्यात आली. यामुळे कर्तव्यदक्ष सहाय्यक अभियंता श्री. आर. आर. थावरे, टेक्निशियन व्ही. आर. मुंडे, बायस्त्रोत उस्मान शेख, लाईनमन किशोर जाधव यांचा पाञुड येथील पत्रकार नईम आतार, पत्रकार पृथ्वीराज निर्मळ, पत्रकार आणि अनिस अंन्सारी, पत्रकार दीपक चांदमारे यांनी या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
    दर्गा वन, बम्बैया टु, व बेस येथील कामास सुरुवात झाल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत असून. पाञुड येथील या वॉर्डातील नागरिकांनी पत्रकार बांधव व सहाय्यक अभियंता श्री. आर. आर. थावरे यांचे आभार मानले.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here