बुधवार, 25 नोव्हेंबर 2026
जाहिरातीसाठी संपर्क
वर्तमान महाराष्ट्र
⌕
ब्रेकिंग न्यूज
कवी संमेलन

साहित्यरत्नांची तोरखेड्यात मांदियाळी! कवयित्री पुजा सोनार यांच्या ‘मनाच्या गाभाऱ्यातून’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन





साहित्यरत्नांची तोरखेड्यात मांदियाळी! कवयित्री पुजा सोनार यांच्या ‘मनाचा गाभाऱ्यातून’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन

नंदुरबार: जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील कवयित्री पुजा सोनार यांच्या ‘मनाच्या गाभाऱ्यातून’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. सामाजिक जाणीवा आणि स्त्रीमनातील भावना प्रभावीपणे मांडणाऱ्या या काव्यसंग्रहाचे साहित्यप्रेमींनी मनसोक्त स्वागत केले.

मान्यवरांची मांदियाळी

कार्यक्रमाचे प्रकाशन प्राचार्य सौ. सारिका रंधे (शिरपूर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मोहनदास भामरे (साहित्यिक व विचारवंत, शिरपूर) होते. यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते:

  • किरण प्रकाश: सुप्रसिद्ध कवी, पुणे
  • शिवाजी पाटील: लेखक, गीतकार तथा अभिनेते
  • डॉ. तुषार सनसे: रा.काँ. (शा.प.) जिल्हाध्यक्ष, नंदुरबार
  • अजय बिरारी: अभिनेते तथा अहिराणी मराठी गझलकार
  • सौ. मनीषा गरूड: सरपंच, तोरखेडा
  • प्राचार्य जीवन जगताप आणि अहिर सुवर्ण समाज अध्यक्ष, शहादा

राज्यातून साहित्यिकांचा ओघ

मुंबई येथील वारकरी प्रकाशन यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यासाठी पुणे, नाशिक, सुरत, अमळनेर, धुळे आणि शिरपूर अशा लांब वरून आलेल्या कवींनी आणि साहित्यिकांनी हजेरी लावली होती. नामंकित गझलकार आणि संगीतकारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. गावातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने तोरखेडा परिसर काव्यमय झाला होता.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन यशवंत निकवाडे (शिरपूर) यांनी केले. कवयित्रीने आपल्या शब्दांतून समाजातील विविध छटा प्रभावीपणे मांडल्याचा सूर मान्यवरांच्या भाषणातून उमटला.

संपादकीय मत:
ग्रामीण भागातील प्रतिभेला व्यासपीठ मिळणे ही आनंदाची बाब आहे. पुजा सोनार यांच्या लेखणीतून उमटलेले हे शब्द खान्देशच्या साहित्य संस्कृतीला अधिक समृद्ध करतील, यात शंका नाही. ‘वर्तमान महाराष्ट्र’ परिवारातर्फे कवयित्रीला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!


वर्तमान महाराष्ट्र

आपली प्रतिक्रिया नोंदवा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत