निलंग्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त काँग्रेस कमिटीच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले
निलंग्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त काँग्रेस कमिटी कार्यालयात ध्वजारोहण
निलंग्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त काँग्रेस कमिटीच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातूर प्रतिनिधी
निलंगा येथील काँग्रेस कमिटी कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सिद्धूअण्णा आवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निलंगा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा. अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर (भैय्यासाहेब) यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य महमंदखाँ पठाण, माजी नगर परिषद सभापती अशोकअप्पा शेटकर, नगरसेवक सुधीर लखनगावे, ला.जि.म.स. बँकेचे व्यवस्थापक व्यंकटराव शिंदे, निलंगा तालुका अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष लाला पटेल, माजी पं.स. सभापती दिलीपराव फुलसुरे, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सोनाजीराव कदम, उद्योजक अनिल अग्रवाल, श्रीधर झरकर, महेशअप्पा चिक्राळे, गोविंदराव उसनाळे, अँड. विक्रांत सूर्यवंशी, व्यंकटराव साळुंके, चेअरमन शिवाजीराव चव्हाण, पांडुरंग बिरादार, बालाजीराव मुगळे, पाखरसांगवे, बालाजी मोरे, बाबुराव सोमवंशी, प्रमोद ढेरे, देविदासराव जाधव, बबलू जाधव, अर्जुन जाधव दादगीकर, भागवत बिराजदार, राहुल घोडके, बबर पठाण, ज्येष्ठ पत्रकार मोहन क्षिरसागर, सोहेल शेख, महादेव झरकर, विलास बोळे,
खलील शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाला आदराने अभिवादन करण्यात आले. तसेच, मराठवाड्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करण्यात आला.
