More

    सोलापुरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करा:रात्री-अपरात्रीही पाणी देणे थांबवा, महापौर विनायक कोंड्याल यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश

    Published on:

    [%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4 %E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8 %E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%86%E0%A4%A1 %E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A4%BE %E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80 %E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80 %E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80 %E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87 %E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%BE %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0 %E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95
    उजनी धरणात मुबलक पाणी आहे. समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. नवीन जॅकवेल बसवले. एवढे करूनही चार दिवसाआड पाणीपुरवठा कशाला? असा प्रश्न करून महापौर विनायक कोंड्याल यांनी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. रात्री-अपरात्री पाणी देण्याचा प्रकारही थांबवण्यास सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोरच पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत महापौर कोंड्याल यांनी पहिली सर्वसाधारण सभा होण्याआधीच अधिकाऱ्यांना आदेश दिले. महापौरपदी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य राहील, असे कोंड्याल म्हणाले होते. त्यानुसार पहिली सर्वसाधारण सभा होण्याआधीच त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. अनुकूल स्थिती असल्यानेच सूचना दिल्या, सुधारित वेळापत्रक होईल पाणी पुरवठ्यातील अडचणी जाणून घेतल्या. दोन दिवसांआड पाणी देण्यासाठी अनुकूल स्थिती असताना का होत नाही? असाही प्रश्न केला. पुरवठ्याचे नियोजन, सुधारित वेळापत्रक देण्यास सांगितले. विनायक कोंड्याल, महापौर प्रशासकीय कारकिर्दीतऐकले
    नाही… आताऐकावेच लागेल! गेल्या तीन वर्षांत पाऊसमान चांगलाच होता. उजनी जलाशयात मुबलक पाणी होते. समांतर जलवाहिनीचे काम होऊनही वर्ष होत आहे. त्याने अतिरिक्त पाणी मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दोन नव्हे, तीन दिवसांआड पाणी देण्याची मागणी पुढे आली होती. लोकभावना समजून तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तेव्हाच्या प्रशासक शीतल तेली-उगले यांना सूचना केली होती. परंतु त्याऐकल्या नाहीत. आता अधिकाऱ्यांना सभागृहात उत्तरे द्यावी लागतील म्हणून कोणतीही आढेवेढे न घेता अधिकाऱ्यांनी महापौरांपुढे होकार दर्शवला. दिव्य मराठीने या विषयी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला आहे.
    https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/solapur-mayor-vinayak-kondyal-water-supply-orders-137219215.html

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here