[
वैजापूर तालुक्यातील हडसपिंपळगाव येथे राष्ट्रसंत जाणार्धन स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गेली ३६ वर्षे हा सप्ताह सातत्याने साजरा केला जात आहे. यंदाचा सप्ताह २३ जानेवारीपासून सुरू झाला असून ३० जानेवारी रोजी सांगता होणार आहे. सांगतेच्या दिवशी श्री जगतगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे प्रवचन होईल. सप्ताहात दररोज सकाळी काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी संगीतमय श्रीमद्भागवत कथा आणि रात्री आठ वाजता कीर्तन व प्रवचन होत आहे. दुपारी होणाऱ्या भागवत कथांचे वाचन ह.भ.प. भागवताचार्य श्रीहरी महाराज करत आहेत. सप्ताहाच्या पाचव्या दिवशी श्री १००८ स्वामी शिवगिरी महाराज निलपर्वत आश्रम त्र्यंबकेश्वर यांनी प्रवचन केले. त्यांनी सांगितले की, भावसागर पार करण्यासाठी संत संग आवश्यक आहे. जो मनुष्य सद्गुरूंच्या सान्निध्यात राहतो, त्याचे जीवन नक्कीच कल्याण पावते. आजची तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. तरुणांनी कोणत्याही वाईट सवयींपासून दूर राहावे, असा उपदेश त्यांनी दिला. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्ती गीतांनी प्रवचनाचा समारोप झाला. यावेळी सप्ताह समितीच्या वतीने शिवगिरी महाराज यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पोलिस पाटील कारभारी पा. निघोटे, कौरोजी निघोटे, सुखदेव निघोटे, माधवराव निघोटे, अशोकराव निघोटे, वाल्मिक निघोटे, आप्पाराव निघोटे, नारायण गाजरे, ज्ञानेश्वर निघोटे, गणेश निघोटे, भगवान गाजरे, वसंत निघोटे, अशोक नागरे, राजेंद्र निघोटे, योगेश निघोटे, आबासाहेब निघोटे, महेश निघोटे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती. नागरिकांनी या कीर्तनाला उस्त्फूर्त असा प्रतिसाद दर्शविला. यावेळी हडसपिंपळगाव आणि सभोवतालच्या परिसरातील वातावरम अतीशय भक्तीमय झाल्याचे बघावयास मिळाले होते. मागील ३६ वर्षांपासून हा अखंड हरीनाम सप्ताह हडसपिंपळगाव येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरा करण्यात येतो. पंचक्रोशीतील नागरिक या सोहळ्यासाठी आपापल्या परिने सेवा प्रदान करतात. वाईट सवयींपासून दूर राहावे भावसागर पार करण्यासाठी संत संग आवश्यक आहे. जो मनुष्य सद्गुरूंच्या सान्निध्यात राहतो, त्याचे जीवन नक्कीच कल्याण पावते. आजची तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. तरुणांनी कोणत्याही वाईट सवयींपासून दूर राहावे, असे महाराज म्हणाले.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/in-the-presence-of-the-sadguru-human-life-is-blessed-sivagiri-maharaj-hadas-pimpalgaon-akhand-harinama-week-to-commemorate-the-merits-of-janardan-swami-maharaj-137068271.html
सद्गुरूंच्या सान्निध्यात मानव जीवन कल्याण पावते- शिवगिरी महाराज:हडस पिंपळगावात जनार्दन स्वामी महाराज पुण्यस्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह




