More

    शिवपूर येथील श्री महालक्ष्मी गणेश मंडळाकडून शालेय साहित्य वाटप

    Published on:

    यावेळी गणेश मंडळाचे सक्रिय सदस्य, शाळेचे शिक्षक, आणि महत्त्वाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित

    शिवपूर, लातूर- येथील श्री महालक्ष्मी गणेश मंडळाने यंदाही सामाजिक बांधिलकी जपत एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना गणेश मंडळाच्या वतीने वही व पेन वाटप करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

    यावेळी गणेश मंडळाचे सक्रिय सदस्य, शाळेचे शिक्षक, आणि महत्त्वाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाले.
    उपस्थित मान्यवर
    या प्रसंगी श्री महालक्ष्मी गणेश मंडळाचे नवयुवक बाळासाहेब महाके, बळी गोडपटले, महेश चात्रे, शिवांनद गुंठे, नागनाथ वडमिले, नामदेव गुंठे, करण गुंठे, शफी वडमिले उपस्थित होते. त्यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय, शाळेचे मुख्याध्यापक गुरुनाथ सिंधाळकर साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नितेश कांबळे, तसेच शिक्षक कलवले सर, देवरशे सर, वाघमारे सर यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली.
    सामाजिक उपक्रमांचे कौतुक
    श्री महालक्ष्मी गणेश मंडळ गेली अनेक वर्षे असे सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी एक आदर्श निर्माण करत आहे. शालेय साहित्य वाटपासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अधिक आवड निर्माण होते आणि त्यांना पुढील अभ्यासासाठी प्रेरणा मिळते. स्थानिक प्रशासनाने आणि पालकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here