More

    विमान अपघात तपासासाठी रोहित पवार घेणार खासगी गुप्तहेरांची मदत:VSR कंपनीवर कारवाई नाही; अजित पवार यांच्या अपघातामागील कारण शोधण्याचा निर्धार

    Published on:

    [%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8 %E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4 %E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 %E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4 %E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0 %E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0 %E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A5%80 %E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80 %E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4VSR %E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0
    राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशयाचे वातावरण कायम आहे. या दुर्घटनेमागे घातपात असू शकतो, अशी शक्यता व्यक्त करत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी अपघाताच्या कारणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू केली असली तरी त्यापलीकडे कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे आता रोहित पवार स्वतः या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या रोहित पवार दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. विमान अपघातामागील खरे कारण शोधण्यासाठी ते हवाई क्षेत्रात वैमानिक किंवा इतर पदांवर काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. तज्ज्ञांकडून माहिती गोळा करून अपघाताची शक्यता, तांत्रिक बाबी आणि नियमांचे पालन झाले होते का, याचा अभ्यास ते करत आहेत. अपघाताच्या चौकशीचा अधिकृत अहवाल येण्यास विलंब होत असल्याने त्यांनी स्वतंत्र पातळीवर माहिती संकलन सुरू केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अधिकृत चौकशी अहवाल यायला अजून वेळ लागू शकतो, असे संबंधित अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र हा अहवाल लवकर मिळावा आणि अपघातामागील सत्य स्पष्ट व्हावे, यासाठी रोहित पवार यांनी खासगी गुप्तहेरांची मदत घेतल्याची माहिती समोर येत आहे. अपघातातील प्रत्येक पैलू तपासला जावा आणि कोणतीही बाब दडपली जाऊ नये, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या दुर्घटनेला आज 20 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे संशयाचे सावट अधिक गडद होत आहे. तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात कोणतीही कारवाई अद्याप झालेली नसल्याचा आरोपही केला जात आहे. या पार्श्वभूमीवर DGCA ने तातडीने प्राथमिक अहवाल सादर करावा आणि संबंधित कंपनीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून केली आहे. अजित पवार 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचे चार्टर्ड विमान मुंबई येथून उड्डाण झाले. सुमारे 8.45 च्या सुमारास विमान बारामती परिसरात पोहोचले. मात्र बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच ते बाजूच्या शेतात जाऊन कोसळले. विमान खाली आदळल्यानंतर त्याचा स्फोट झाला. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. विलंबामुळेच संशयाला अधिक वाव या घटनेनंतर संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक बिघाड, हवामानातील बदल, मानवी चूक किंवा अन्य कारणे अशा विविध शक्यतांचा तपास केला जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आतापर्यंत कोणतीही ठोस माहिती अधिकृतरीत्या समोर आलेली नाही. त्यामुळे अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत स्पष्टता आलेली नाही. या विलंबामुळेच संशयाला अधिक वाव मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. खासगी पातळीवरही तपासाची दिशा शोधण्याचा प्रयत्न एकूणच, अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यात शोककळा पसरली असली तरी त्यांच्या विमान अपघाताबाबतचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. रोहित पवार यांनी स्वतः पुढाकार घेत दिल्लीमध्ये तज्ज्ञांशी चर्चा सुरू केली आहे आणि खासगी पातळीवरही तपासाची दिशा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अधिकृत अहवाल लवकर समोर यावा आणि या दुर्घटनेमागील सत्य स्पष्ट व्हावे, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे. जोपर्यंत चौकशीचा निकाल स्पष्ट होत नाही, तोपर्यंत या अपघाताभोवतीचे संशयाचे धुके कायम राहण्याची शक्यता आहे.
    https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/rohit-pawar-investigates-ajit-dada-plane-accident-137221194.html

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here