27.9 C
Pune
रविवार, ऑगस्ट 23, 2026

Buy now

spot_img
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related News

मुंब्रा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी:3 महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या टोळीला अकोल्यातून अटक

[
मुंब्रा परिसरातून अवघ्या 3 महिन्यांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या एका टोळीचा मुंब्रा पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील खेटरी गावातून आरोपींना ताब्यात घेऊन चिमुरडीची सुखरूप सुटका केली आहे. दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास फिर्यादी फरजाना मोहम्मद फिरोज मन्सुरी या आपल्या दोन मुलींना घेऊन मुंब्रा येथील खडीमशीन रोडवरून जात होत्या. त्यांची मोठी मुलगी रडत असल्याने एका अनोळखी बुरखाधारी महिलेने मदतीचा बहाणा केला. ‘छोटी बच्ची को मेरे गोद मे देदो, मै भी सामने ही जा रही हूँ’ असे म्हणून तिने 3 महिन्यांच्या आफियाला आपल्या कडेवर घेतले आणि संधी मिळताच तिथून पळ काढला. तपासाचे मोठे आव्हान आणि पोलिसांचे चातुर्य या घटनेनंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासासाठी तात्काळ 4 पथके तैनात करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी अत्यंत चिकाटीने काम केले. मुंब्रा ते सीएसएमटी आणि मुंब्रा ते टिटवाळा या दरम्यानचे सुमारे 1600 सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. विशेष म्हणजे आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बाळाचे कपडे आणि स्वतःचा बुरखा बदलला होता. अशा परिस्थित मोठे आव्हान असताना पोलिस पथकाने सलग 6 दिवस दररोज 16 ते 18 तास काम करून तपासाचे धागेदोरे जोडले. अकोल्यात पडली झडप तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी प्रथम मुंब्रा येथील नसरीन इकलाख शेख हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस पथकाने थेट अकोला गाठले. तेथून मोहम्मद मुजीब गुलाब (31 वर्षे) आणि त्याची पत्नी खैरुणिसा मुजीब मोहम्मद (30 वर्षे) यांना अटक करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक ठाणे शहराचे पोलिस आयुक्त अशुतोष डुंबरे, सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाखरे करत आहेत. आरोपींची सविस्तर माहिती या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. नसरीन इकलाख शेख ही महिला मुंब्रा येथील शादी महल हॉल रोड, इन्शानगर भागात राहणारी आहे. सीसीटीव्ही तपासात ती मुंब्रा रेल्वे स्टेशनवरून रिक्षानी जाताना दिसली होती. तिच्याच माहितीवरून पोलिसांनी मुख्य आरोपींचा शोध लावला. मोहम्मद मुजीब गुलाब (वय 31 वर्षे) हा मुख्य आरोपी अकोला जिल्ह्यातील खेटरी (ता. पातुर) येथील हाजी नगरचा रहिवासी आहे. तो मुंब्रा रेल्वे स्टेशनवर अपहरण करणाऱ्या महिलेची वाट पाहत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. खैरुणिसा मुजीब मोहम्मद (वय 30 वर्षे) ही मोहम्मद मुजीबची पत्नी असून ती देखील या गुन्ह्यात सामील होती. तिला आणि तिच्या पतीला अकोल्यातून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3 महिन्यांची मुलगी आफिया हिला सुखरूप ताब्यात घेतले आहे.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/akola-police-arrest-gang-kidnap-3-month-old-baby-137080525.html

🔴 BREAKING
वर्तमान महाराष्ट्रच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या...