27.9 C
Pune
रविवार, ऑगस्ट 23, 2026

Buy now

spot_img
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related News

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात सर्वधर्म प्रार्थना:गांधी विचार कधीही संपणार नाहीत, ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांचे प्रतिपादन

[
महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे येथील गांधी भवन, कोथरूड येथे शुक्रवारी सर्वधर्म प्रार्थना आणि भजन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि माजी आमदार उल्हास पवार यांनी गांधी विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, गांधी विचार कधीही संपणार नाहीत आणि त्यांना जगभरात मान्यता व सन्मान आहे. कार्यक्रमात ‘मानवतेसाठी लढणारा महात्मा’ या अॅड. शंकर निकम लिखित पुस्तकाचे प्रकाशन शीलाताई बाबा आढाव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उल्हास पवार यांच्यासह डॉ. चैत्रा रेडकर, लक्ष्मिकांत देशमुख आणि अन्वर राजन व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने या कार्यक्रमाचे संयोजन केले. उल्हास पवार यांनी आपले अनुभव कथन करताना सांगितले की, लंडन आणि वॉशिंग्टन येथे गांधीजींच्या जीवनावर आधारित चित्रपटांचे सर्व शो हाऊसफुल्ल होते. तेथे तीन पिढ्या एकत्र बसून चित्रपट पाहत होत्या. परदेशी नागरिक गांधीजींच्या देशातून आलेला म्हणून त्यांच्याशी संवाद साधत होते. हे गांधी विचारांच्या जागतिक प्रभावाचे द्योतक आहे. पवार पुढे म्हणाले की, गांधीजींच्या हत्येचे सहा वेळा प्रयत्न झाले आणि त्यांचे विचार संपवण्याचे अनेकदा प्रयत्न झाले व आजही होत आहेत. गांधीजींची हत्या झाली असली तरी त्यांचे विचार आजही लोकांच्या मनात, विचारात आणि आचरणात जिवंत आहेत. त्यांच्यावर असंख्य पुस्तके लिहिली गेली आहेत. अॅड. शंकर निकम यांनी गांधी विचारांचा अतिशय बारकाईने मागोवा घेतला असून, त्यांचे वाचन व चिंतन सर्व वयोगटातील लोकांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. डॉ. चैत्रा रेडकर यांनी गांधीजींच्या जात निर्मूलनाविषयीच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, गांधीजींनी जात नको, पण ज्या व्यवसायामुळे जात नावास आली, तो व्यवसाय आणि ते कलाकौशल्य टिकवले पाहिजे अशी भूमिका घेतली होती. तेल घाणा कसा चालवायचा याचे ज्ञान तेली समाजातील व्यक्तींना आहे, त्याचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी होऊ शकतो. त्यांनी स्पष्ट केले की, तेली समाजाला वर्षानुवर्षे जातीवरून हिणवले गेले, त्यामुळे तरुण पिढी आता इतर व्यवसाय आणि नोकरीकडे वळत आहे. अशा स्थितीत जात नको, पण व्यवसाय टिकवा असे गांधीजींचे मत होते. समाजात द्वेष पसरवण्यासाठी समाजमाध्यमातून गांधीजींविषयी जो अपप्रचार केला जातो, त्याला अभ्यासपूर्ण लेख आणि अनुभवाद्वारे नेस्तनाबूत करण्याची गरज आहे. अॅड. निकम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गांधीजींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या माध्यमातून इंग्रजांवर दबाव आणला. त्यांच्या आंदोलनात प्रत्येक जाती, धर्म आणि व्यवसायाचे लोक सहभागी होते.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/ulhas-pawar-gandhi-thoughts-unending-pune-137080077.html

🔴 BREAKING
वर्तमान महाराष्ट्रच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या...