More

    बालाजीनगरमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा माहेश्वरी अन्नकुट ग्रुपतर्फे सत्कार:राजस्थानी थाटात गौरव; एकत्रितपणे कामाची अपेक्षा

    Published on:

    [%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87 %E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4 %E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80 %E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F %E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87 %E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80 %E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4 %E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%B5 %E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87
    छत्रपती संभाजीनगर येथील बालाजीनगर परिसरात माहेश्वरी अन्नकुट ग्रुपच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 आणि 21 मधील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या लोकप्रतिनिधींना समाजाच्या वतीने सन्मानित करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हा सत्कार सोहळा बालाजीनगरमधील अशोक भुतडा यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माहेश्वरी समाजाच्या परंपरेनुसार नवनिर्वाचित नगरसेवकांचा राजस्थानी पगडी, शाल, श्रीफळ, हार, पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन गौरव करण्यात आला. प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेवक गणेश नांवदर, त्रिंबक तुपे, जालिंदर शेंडगे, अनिता मानकापे आणि अर्चना निळकंठ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर प्रभाग क्रमांक 21 मधील नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, नंदकिशोर गवळी, सुमित्रा मात्रे आणि कमल थोरात यांनाही सन्मानित करण्यात आले. सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सोहळ्यास उपस्थित होते. सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नगरसेवकांच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त करत, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. समाजाच्या विकासासाठी आणि परिसराच्या प्रगतीसाठी सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे काम करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. माहेश्वरी अन्नकुट ग्रुप समाज नेहमीच सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहेश्वरी अन्नकुट ग्रुपचे राजेंद्र मुंदडा, बस्तीराम चांडक, द्वारकादास बाहेती, शिवप्रसाद मुंदडा, अशोक भुतडा, महेश राठी, गणेश हेडा, अ‍ॅड. संतोष मालपणी आणि विजयकुमार लाहोटी यांनी विशेष परिश्रम घेतले. या सत्कार सोहळ्यास माहेश्वरी समाजासह इतर समाजातील अनेक नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे आणि सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले.
    https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/balajinagar-maheshwari-annakut-felicitates-new-corporators-137041308.html

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here