More

    बारामतीत प्रजासत्ताक दिन वादात सापडला:कार्यक्रमात बाबासाहेबांची प्रतिमा नसल्याने अनुयायी आक्रमक, नगराध्यक्ष सचिन सातवांवर शाईफेक

    Published on:

    [%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4 %E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95 %E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8 %E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4 %E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4 %E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80 %E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE %E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87 %E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80 %E0%A4%86%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%95
    बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक केल्याची घटना आज सकाळी घडली. नगर परिषदेच्या वतीने आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न लावल्याने आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले होते. नगराध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त करण्याची अपेक्षा असताना, त्यांनी ती केल्याने संतप्त झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नगर परिषद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती नगर परिषदेत ध्वजवंदनाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महात्मा गांधी यांची प्रतिमा लावण्यात आली होती. मात्र, ज्या संविधानामुळे प्रजासत्ताक दिन साजरा होतो, त्या संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कार्यक्रमात कोठेही दिसली नाही. प्रशासनाच्या या कृतीला ‘अवमान’ मानत कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलन आणि शाईफेक या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी आणि निषेध नोंदवण्यासाठी आज सकाळी मोठ्या संख्येने विविध संघटना आणि विविध पक्षांनी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. नगराध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त करावी, अशी अपेक्षा आंबेडकरी अनुयायांनी व्यक्त केली. मात्र, नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिलगरिी व्यक्त न केल्याने आंदोलकांचा संताप अनावर झाला आणि काही कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या अंगावर शाई फेकत, जोरदार घोषणाबाजी केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. पोलिस घटनास्थळी दाखल शाईफेकीच्या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलकांनी प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
    https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/baramati-municipal-president-sachin-satav-ink-attack-ambedkar-photo-controversy-137054187.html

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here