More

    पुणे विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन:भाषा, संस्कृती आणि विचारांच्या आदानप्रदानातून ‘श्रेष्ठ भारत’ घडेल– रक्षा खडसे

    Published on:

    [%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87 %E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A4 %E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF %E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE %E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE %E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80 %E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF %E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8
    केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, भाषा, संस्कृती आणि विचारांच्या आदानप्रदानातून ‘श्रेष्ठ भारत’ घडेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजनेचे पुणे क्षेत्रीय कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर ११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान विद्यापीठाच्या नामदेव सभागृहात पार पडले. बुधवारी या शिबिराचा समारोप झाला. यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव चारुशीला गायके, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालक अजय शिंदे, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, अधिष्ठाता डॉ. संजय तांबट आणि विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. गणेश भामे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खडसे म्हणाल्या की, जेव्हा सर्व राज्यातील विद्यार्थी एकत्र येऊन भाषा, संस्कृती आणि विचारांची देवाणघेवाण करतील, तेव्हाच एक श्रेष्ठ भारत घडेल. आजच्या तरुण पिढीला घडवण्यात राष्ट्रीय सेवा योजनेची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा उल्लेख करत, त्यांच्या योगदानामुळेच आपण आज येथे आहोत, अशी भावना व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण काम करता येते, असेही खडसे यांनी नमूद केले. त्यामुळे या योजनेतील स्वयंसेवकांची संख्या वाढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ‘विकसित भारत (२०४७)’ केवळ पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानानेच नव्हे, तर विचाराने देखील बनेल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. या शिबिरात विविध राज्यांतील सहभागी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या सादरीकरणातून “एक भारत, श्रेष्ठ भारत”चा संदेश दिला. समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते १२ राज्यांतून आलेल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. परस्पर संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीतून राष्ट्रीय ऐक्य अधिक बळकट झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. गणेश भामे यांनी आभार प्रदर्शन केले.
    https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/raksha-khadse-shreshth-bharat-pune-vidyapith-137230917.html

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here