More

    पुणे जिल्ह्यात 'निसर्गनाद' छायाचित्र प्रदर्शन:जैवविविधता दर्शवणारे अनोखे प्रदर्शन, 27 फेब्रुवारीपासून सुरुवात

    Published on:

    [%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87 %E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4 039%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6039 %E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0 %E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A4%BE %E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87 %E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A5%87 %E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8 27 %E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8
    पुणे जिल्ह्यातील समृद्ध जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी ‘निसर्गनाद’ हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत रसिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. कुशल कुलकर्णी, स्वप्नील थत्ते आणि रमाकांत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रदर्शनात पुणे जिल्ह्यातील जंगले, माळराने आणि जलाशयांमधील पक्षी, प्राणी, कीटक, फुलपाखरे आणि उभयचरांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्याची अनोखी आणि नयनरम्य जैवविविधता छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. या प्रदर्शनासाठी पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, जेजुरी, बारामती आणि इंदापूर येथून १५० हून अधिक छायाचित्रकारांनी २ हजारांहून अधिक छायाचित्रे पाठवली होती. त्यापैकी निवडक आणि उच्च प्रतीच्या १५० ते १६० छायाचित्रांचा समावेश प्रदर्शनात करण्यात आला आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, नगरसेविका डॉ. निवेदिता एकबोटे, नगरसेवक अॅड. कुणाल टिळक आणि प्रसिद्ध छायाचित्रकार चंद्रशेखर बापट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. वेध कम्युनिकेशनचे निलेश मोघे यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे. द वाईल्ड एअर, रेड कार्पेट इव्हेंटस्, ओम सिस्टीम्स आणि प्राईम्स ॲन्ड झूम्स यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले आहे. हे प्रदर्शन सर्व पुणेकरांसाठी एक निसर्गरम्य पर्वणी ठरणार असून, रसिकांनी २७ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
    https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/punefilmfestival-biodiversity-exhibition-opens-feb-27-137222766.html

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here