27.9 C
Pune
रविवार, ऑगस्ट 23, 2026

Buy now

spot_img
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related News

'ज्यांनी ही गाडी दिली, त्यांनाच शेवटचे न्यावे लागले…':अजितदादांच्या आठवणीत रुग्णवाहिका चालकाला अश्रू अनावर, 6 महिन्यांपूर्वीची सांगितली कहाणी

[
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असतानाच, त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान एक अत्यंत भावूक आणि मन हेलावणारी बाब समोर आली आहे. बुधवारी सकाळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे येत असताना अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेनंतर त्यांचे पार्थिव ज्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयातून स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आले, ती रुग्णवाहिका खुद्द अजित पवार यांनीच अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बारामती नगरपरिषदेला भेट दिली होती. ज्या लोकनेत्याने जनतेच्या सेवेसाठी ही गाडी उपलब्ध करून दिली, त्याच गाडीतून त्यांना शेवटचा निरोप दिला जावा, हा नियतीचा एक क्रूर योगायोग ठरला. बारामती नगरपरिषदेचे रुग्णवाहिका चालक नाझीम काझी यांच्यासाठी हा प्रवास आयुष्यातील सर्वात जड आणि दुखाचा होता. या घटनेबद्दल सांगताना काझी भावूक झाले. सुमारे सहा महिन्यांपूर्वी बारामती नगरपरिषदेकडे दशकाहून अधिक जुनी रुग्णवाहिका असल्याचे अजित पवारांच्या निदर्शनास आले होते. त्यावर तातडीने उपाययोजना करत, दादांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोणतीही दिरंगाई न करता आधुनिक सोयींनी सज्ज अशी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली दिल्याचे काझी यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर काही वर्षांपूर्वी नाझीम काझी यांनी नोकरीसाठी मदत मागितली होती, तेव्हा अजित पवारांनीच त्यांना नगरपरिषदेच्या रुग्णवाहिका चालकाची नोकरी लावल्याचेही त्यांनी सांगितले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण- नाझीम काझी नाझीम काझी म्हणाले, जेव्हा आजीत दादांनी ही रुग्णवाहिका सोपवली तेव्हा त्यांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली, ‘तुमचे काम पूर्ण प्रामाणिकपणे करा’. त्यांचा आवाज आजही माझ्या कानात घुमतो आहे. मला कल्पनाही नव्हती की त्यांनी मला जीव वाचवण्यासाठी जे वाहन दिले होते त्याच वाहनातून मला त्यांचे पार्थिव न्यावे लागेल. हा माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण आहे, हे सांगताना काझींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/ajit-pawar-ambulance-driver-tears-baramati-137073552.html

🔴 BREAKING
वर्तमान महाराष्ट्रच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या...