More

    ज्ञानमंदिर कळंबोलीने जिंकला मएसो क्रीडा करंडक:बालशिक्षण मंदिर, कोथरूड येथे राज्यस्तरीय स्पर्धेची सांगता

    Published on:

    [%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0 %E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87 %E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE %E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%8B %E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE %E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3 %E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0 %E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A1 %E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87 %E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF
    महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) क्रीडावर्धिनी आणि कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’ या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मएसो ज्ञानमंदिर कळंबोली या शाळेने पटकावले. यासह ही शाळा फिरत्या करंडकाचीही मानकरी ठरली. या स्पर्धेचे हे १४ वे वर्ष होते. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ही तीन दिवसीय निवासी क्रीडा स्पर्धा बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड येथे पार पडली. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते रविवारी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी ‘मएसो’चे उपाध्यक्ष प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, क्रीडावर्धिनी व शाला समितीचे अध्यक्ष विजय भालेराव, ‘मएसो’चे सचिव अतुल कुलकर्णी, सहसचिव सुधीर भोसले, शाला समिती महामात्र डॉ. नेहा देशपांडे, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी, मंजुषा दुर्वे, सायली देशमुख यांच्यासह संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते. तेजल हसबनीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून क्रीडासंस्कृती रुजवण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात. यातून त्यांच्यात संघभावना, शिस्त, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती विकसित होते. चांगला माणूस घडवण्यासाठी खेळांतून प्रोत्साहन मिळते.” अध्यक्षीय मनोगतात प्रदीप नाईक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भविष्यात यातील काही विद्यार्थी ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षीचा ‘मएसो क्रीडा करंडक’ पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके महाविद्यालय येथे आयोजित केला जाईल, अशी घोषणा विजय भालेराव यांनी केली. कार्यक्रमाचे स्वागत-प्रास्ताविक बाबासाहेब शिंदे यांनी केले. डॉ. वैशाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर मंजुषा दुर्वे यांनी आभार प्रदर्शन केले.
    https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/balshikshan-mandir-kothrud-state-level-sports-competition-concludes-137040762.html

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here