[
कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर मारहाण करून तिघांना जखमी केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणीचा विनयभंग केल्याचेही तक्रारीत नमुद केले असून या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी 16 जणांवर बुधवारी ता. 28 रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपाधिक्षकांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात किरकोळ कारणावरून एका कुटुंबासोबत वाद झाला होता. त्यातून बुधवारी सकाळ पासूनच कुरबुर सुरु होती. त्यानंतर काही वेळात या घटनेचा राग मनात धरून गावातील सोळा जणांनी पुन्हा वाद उकरून काढला अन त्या कुटुंबातील तिघांना लोखंडी रॉड, काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर गावकऱ्यांनी सोडवा सोडव केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक कुंदनकुमार वाघमारे, पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, उपनिरीक्षक संतोष इंगळे, जमादार गजानन होळकर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी एका तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांनी भाऊराव मस्के, रामराव मस्के, रमेश मस्के, ज्ञानेश्वर मस्के, अंकोश मस्के, बालाजी मस्के, शिवशंकर मस्के, वैभव मस्के, विशाल मस्के, कानबाराव खंडके, गजानन मस्के, विष्णू मस्के यांच्यासह सहा महिलांवर रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. उपाधिक्षक वाघमारे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी या घटनेतील आरोपींचा शोध सुरु केला असून त्यासाठी स्वतंत्र पोलिस पथक स्थापन केल्याचे सुत्रांनी सांगितले.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/hingoli/news/kalmanuri-assault-molestation-case-filed-16-against-137068843.html
कळमनुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मारहाण:तिघे जण जखमी, विनयभंग केल्याचीही तक्रार, 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल




