More

    एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही:जामीन मिळताच गोगावलेंचा आक्रमक पवित्रा, विरोधकांना थेट इशारा

    Published on:

    [%E0%A4%8F%E0%A4%95 %E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8 %E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80 %E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8 %E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8 %E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87 %E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA %E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE %E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8 %E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A
    रायगडमधील महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट यांच्यात झालेल्या राडा प्रकरणी जामीन मंजूर होताच मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तातडीने कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात करत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला असून, एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, अशा शब्दांत आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला. आपल्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावले यांचे रक्त असल्याचे सांगत त्यांनी ही लढाई थांबणार नसल्याचे संकेत दिले असून, या भूमिकेमुळे महाडमधील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. जामीन मिळाल्यानंतर विकास गोगावले यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विरोधकांना थेट इशारा देत आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला आहे. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, माझ्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावले यांचेच रक्त आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला गेलेले आपल्याला कदापि सहन होत नाही, असे सांगतानाच, न्यायदेवतेचा सन्मान राखण्यासाठीच मी कायदेशीर प्रक्रियेला सामोरे गेलो आणि शरण गेलो, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. त्यांच्या या रोखठोक विधानामुळे महाडमधील राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा सुरू आहे. राडा झाल्यानंतर विकास गोगावले फरार होते महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले फरार झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने महायुती सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे ओढले होते. खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याच मंत्र्यांपुढे हतबल असल्याचे चित्र निर्माण झाल्याची टीका करत न्यायालयाने, गोगावले यांना २४ तासांत हजर करण्याचे आदेश सरकारला दिले होते. न्यायालयाच्या या कडक भूमिकेनंतर आणि प्रशासकीय दबावानंतर विकास गोगावले पोलिसांना शरण आले होते. जामीन मंजूर झाल्यानंतर कारागृहातून बाहेर येताच विकास गोगावले यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी आपल्या विरोधकांना थेट इशारा दिला आहे. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर आणि कायदेशीर लढाई लढल्यानंतर मिळालेल्या जामिनानंतरही गोगावले यांनी आपली आक्रमक शैली कायम ठेवली आहे. कार्यकर्त्यांच्या हितासाठी आपण कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असे संकेत त्यांनी यातून दिले असून यामुळे महाडमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
    https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/mahad-nagar-parishad-election-controversy-vikas-gogavle-activist-meeting-137051212.html

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here