27.9 C
Pune
रविवार, ऑगस्ट 23, 2026

Buy now

spot_img
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related News

अमरावतीत 19 दिवसांपूर्वी झालेली अजित पवारांची सभा ठरली शेवटची:रेल्वे उड्डाण पुलासाठी 125 कोटींच्या निधीची केली होती घोषणा‎

[
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधी मंदिरापुढील मैदानावर शुक्रवारी ९ जानेवारीला सायंकाळी आयोजित विश्वास मेळाव्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण अमरावती येथील शेवटचे भाषण ठरले. १९ दिवसांआधी त्यांनी त्यांच्या भाषणात केलेली विनोदी शैलीतील तुफान फटकेबाजी अजुनही अमरावतीकरांच्या स्मरणात आहे. विकासासाठी मंत्र त्यांनी या वेळी दिला होता. त्यांच्या अचानक जाण्यामूळे अमरावती जिल्हा हळहळला आहे. ९ जानेवारीला त्यांनी अमरावतीचा मुख्य प्रश्न राजकमल चौकातील रेल्वे उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी १२५ कोटीचा निधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात देण्याची घोषणा केली. नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांनी अमरावतीला सीट्रीपलआयटीची भेट दिली. गत चार महिन्यांत दिलेल्या या दोन्ही महत्त्वाच्या बाबी अमरावतीकर दादांच्या नावाने स्मरणात ठेवतील. रेल्वे उड्डाण पुल हा अमरावतीकरांसाठी महत्त्वाचा असल्याची मला जाण आहे. त्यामुळे उर्वरित. पान ४ विधानसभा निवडणुकीदरम्यान १२ नोव्हेंबर २०२४ रोजी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजीत पवार आले होते. मुंबईला त्याच दिवशी पोहोचता यावे म्हणून निवडणूक प्रचाराच्या धावपळीतही ते अगदी वेगाने अमरावती येथील बेलोरा विमानतळावर पोहोचले होते. परंतु, दृश्यमानता पुरेशी नव्हती. अमरावती विमानतळावर नाईट लॅण्डींगची सुविधा नसल्यामुळे त्यांचे खासगी विमान उड्डाण घेऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना व्यस्त कार्यक्रमातही मुंबईत जाता आले नाही. परिणामी अमरावतीतच रात्री मुक्काम करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी १३ नोव्हेंबरला त्यांना सकाळीच प्रचार कार्यासाठी निघावे लागले होते. अमरावती विमानतळावर नाईट लॅण्डींग नसल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसला होता फटका
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/akola/news/ajit-pawars-meeting-held-19-days-ago-in-amravati-turned-out-to-be-the-last-a-fund-of-rs-125-crore-was-announced-for-the-railway-flyover-137068614.html

🔴 BREAKING
वर्तमान महाराष्ट्रच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या...