More

    उजनी धरणातून भीमा नदीत ९० हजार क्युसेक विसर्ग; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

    Published on:

    ​पुणे:

    उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. पूर नियंत्रणासाठी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात सुरू असलेल्या विसर्गमध्ये वाढ करण्यात आली आहे.

    ​आज, १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता उजनी धरणातून भीमा नदी पात्रात ९०,००० क्युसेक एवढा विसर्ग सोडण्यात आला आहे. पाण्याची आवक पाहता या विसर्गात गरज पडल्यास आणखी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    ​नागरिकांना प्रशासनाचे आवाहन:

    • ​नदीपात्रात नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव उतरू नये.
    • ​नदीपात्रातील पंप, साहित्य किंवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
    • ​नदीकाठच्या सखल भागातील संबंधित नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता बाळगावी.

    ​उजनी धरण व्यवस्थापन विभागातर्फे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here