More

    त्रिवेणीबाई पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७ टक्के; दीपक डोरले विद्यालयात प्रथम

    Published on:

    ​नळेगाव : प्रतिनिधी

    येथील त्रिवेणीबाई पाटील विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे आपली देदीप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १० वी शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालात विद्यालयाचा एकूण निकाल ९७ टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

    ​या परीक्षेस विद्यालयातून एकूण ६३ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे २५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश मिळवले आहे. तर १९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि १ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.

    ​विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे:

    ​१) डोरले दीपक रंगनाथ – ९२.००% (विद्यालयात प्रथम)

    २) उदगिरे समर्थ अप्पाराव – ९१.६०%

    ३) कांबळे हर्षद गंगाधर – ९०.२०%

    ४) महाके आकांक्षा अमर – ८९.६०%

    ५) पांढरे पुनम बळवंत – ८७.८०%

    ६) कांबळे अंकिता नितेश – ८५.८०%

    ७) चात्रे गौरवी गणपत – ८४.८०%

    ८) टमके श्रावणी भीष्माचार्य – ८४.४०%

    ९) पाटील राघवेंद्र अमर – ८४.००%

    १०) साबळे श्रेयश दिनकर – ८३.२०%

    ११) महाके प्रिती ज्ञानेश्वर – ८३.००%

    १२) धविले नंदिनी दिनेश – ८२.२०%

    १३) चात्रे पुनम मोहन – ८१.६०%

    १४) भिंगे शांता नामदेव – ८०.६०%

    ​या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे नवनीत शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ. माणिकरावजी पाटील, अध्यक्ष माधवरावजी पाटील, उपाध्यक्ष सूर्यकांतजी रेड्डी, सहसचिव जिवनराव बिराजदार, उमाकांत देवशटवार, तसेच अमरभैय्या पाटील, अभिजीतभैय्या पाटील, कैलासभैय्या रेड्डी, डॉ. प्रशांत शिरुरे, सौ. वृंदा अमर पाटील, अजय पाटील व सर्व संचालक मंडळाने कौतुक केले आहे.

    ​या यशाबद्दल त्रिवेणीबाई पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सगर सर, अनंत तुळजाराम नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रेड्डी सर, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यालयाच्या या यशाने नळेगाव परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here