More

    पुण्यात वंचित’चा महामोर्चा! रस्ते ठप्प, दुकाने बंद; दिल्लीतील कारवाईविरोधात शहर पेटून उठले

    Published on:

    ​पुणे (वर्तमान महाराष्ट्र):

    दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात वंचित’चा महामोर्चा गुरुवारी धडकला. वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला प्रतिसाद देत शहरात हा वंचित’चा महामोर्चा काढण्यात आला. यात हजारो विद्यार्थी, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली.

    ​डेक्कन ते पुणे स्टेशन : भव्य वंचित’चा महामोर्चा

    ​सकाळी १० वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंचित’चा महामोर्चास सुरुवात झाली. हातात तिरंगा ध्वज आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी लक्ष्मी रोड, भवानी पेठ, भिडे वाडा आणि शिवाजी रोड मार्गे मिरवणूक काढली. यानंतर पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या वंचित’चा महामोर्चाचा भव्य समारोप झाला.

    ​मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याचे आवाहन केले. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना शाळा-कॉलेजमध्ये न पाठवून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती. या वंचित’चा महामोर्चाला शहरातील ३० हून अधिक विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला.

    ​कोथरूडमध्ये रस्ता रोको; वाहतुकीचा खोळंबा

    ​दुसरीकडे, कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्ता रोको आंदोलन केले. रस्त्यावर ठिय्या मांडून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती आणि वाहनधारकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

    ​लोकशाही हक्कांवर गदा आणल्याचा आरोप

    ​वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे आणि युवा आघाडी शहराध्यक्ष सागर अल्हाट यांनी सांगितले की, दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीहल्ला हा लोकशाहीच्या मुलभूत हक्कांवर झालेला हल्ला आहे. केंद्र सरकारने तातडीने यावर उत्तरदायित्व स्वीकारावे.

    ​दरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रमुख मार्गांवर आणि कोथरूड परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शहरात अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली असली तरी हा वंचित’चा महामोर्चा शांततेत पार पडला.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here