More

    कविता: फुले – वर्तमान महाराष्ट्र

    Published on:

    ज्ञानदाता फुले

    लेखक: रानकवी जगदीप वनशिव, पुणे

    पुण्यात शिक्षण
    ती ज्योत लावली
    क्रांतीसूर्य जगी
    साऊ ती पाहिली


    महान क्रांतीचा
    दिवस पाहिला
    गुलामगिरी ग्रंथ
    आसूड लिहिला


    दाखविले स्वप्न
    महिला शिकली
    ज्ञानमाता माझी
    सावित्री पाहिली


    ज्योतीबाची मुले
    सावित्री माऊली
    भिडेवाडा सांगू
    ज्ञानगंगा आली


    दांभिकाची पीडा
    किती ती साहिली
    जगण्याची कला
    महिला शिकली

    वर्तमान महाराष्ट्र – निर्भीड पत्रकारिता

    संपादक: श्री. उजगरे रवि रघुनाथ

    संपर्क: 072-7676-1515 | RNI No: MHMAR/25/A4605

    www.vartmanmaharashtra.com

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here