More

    वादळी वाऱ्याचा हाहाकार: शेतातील लिंब अंगावर कोसळून फाटा पोटात शिरल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

    Published on:

    वादळामुळे मोगरा गावावर शोककळा; कुटुंबाचा आधारवड हरपल्याने हळहळ

    ​माजलगाव/प्रतिनिधी:

    तालुक्यातील मोगरा येथे शुक्रवारी झालेल्या भीषण वादळी वाऱ्याने एका कुटुंबाचा आधार हिरावला आहे. शेतात शेळ्या राखत असताना अंगावर लिंबाचे झाड कोसळून, त्याचा फाटा पोटात शिरल्याने सुमनबाई हरिभाऊ घनगाव या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

    ​शुक्रवारी माजलगाव परिसरात सोसाट्याचा वारा आणि पावसाने हजेरी लावली होती. यावेळी मोगरा येथील सुमनबाई घनगाव या आपल्या शेळ्या घेऊन शेतात होत्या. अचानक आलेल्या वादळामुळे शेतातील जुने लिंबाचे झाड मुळासकट कोसळले. या झाडाचा एक मोठा फाटा थेट सुमनबाईंच्या पोटात घुसला, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.

    ​घटनेनंतर ग्रामस्थांनी त्यांना तातडीने माजलगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखम खोल असल्याने आणि प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

    ​कुटुंबाचा आधार हरपला; आर्थिक मदतीची मागणी

    मयत सुमनबाई या त्यांच्या कुटुंबातील मुख्य आधार होत्या. त्यांच्या निधनाने घनगाव कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. एक कष्टकरी महिला आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती गेल्याने मोगरा ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. शासन स्तरावरून या गरीब कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी मागासवर्गीय समाजाच्या वतीने व मोगरा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here