More

    ईगलवूड इंग्लिश स्कूलचा दहावी सी.बी.एस.ई. निकाल दैदिप्यमान; जान्हवी वाघ ९९.६०% गुणांसह जिल्ह्यात प्रथम

    Published on:

    ​माजलगाव | प्रतिनिधी

    फुले पिंपळगाव (ता. माजलगाव) येथील ईगलवूड इंग्लिश स्कूलने दहावी सीबीएसई (CBSE) बोर्ड परीक्षेत यशाचे शिखर सर केले असून, शाळेची विद्यार्थिनी जान्हवी वाघ हिने ९९.६०% गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून गुणवत्तेची ही परंपरा यंदाही कायम राहिली आहे.

    ​या परीक्षेस शाळेतील एकूण १०५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २१ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. २५ विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा जास्त, १९ विद्यार्थ्यांनी ७०% पेक्षा जास्त, तर २० विद्यार्थ्यांनी ६०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

    ​गुणवंत विद्यार्थ्यांची नामावली:

    Eaglewood English School Majalgaon CBSE Result

    शाळेत जान्हवी वाघ (९९.६०%) हिने प्रथम, तेजस्विनी सोलंके (९८.४०%) हिने द्वितीय, तर लखन सावंत (९७.२०%) याने तृतीय क्रमांक पटकावला.

    ​विषयनिहाय विशेष प्राविण्य:

    अनेक विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून विषयांत नैपुण्य मिळवले आहे:

    • ​इंग्रजी, मराठी व संस्कृत: जान्हवी वाघ (१०० गुण)
    • ​माहिती तंत्रज्ञान (IT): जान्हवी वाघ, राघव पवार, आदित्य आतकरे, तेजस्विनी सोळंके आणि अर्णव भुतडा (प्रत्येकी १०० गुण)
    • ​सामाजिक शास्त्र: महेश डाके (९९ गुण)
    • ​विज्ञान: जान्हवी वाघ व तेजस्विनी सोळंके (९७ गुण)
    • ​गणित: जान्हवी वाघ व राघव पवार (९५ गुण)

    ​या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अर्चना पवार, सचिव डॉ. शरद पवार, विश्वस्त डॉ. सुशील लोढा आणि प्राचार्य सत्यजित सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाचे माजलगाव तालुक्यासह जिल्ह्यात कौतुक होत आहे

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here